Joe Biden  Dainik Gomantak
ग्लोबल

US Presidential Election 2023: 80 वर्षीय बायडन पुन्हा लढवणार अध्यक्षपदाची निवडणूक, व्हाईट हाऊसवरील हल्ल्याचा व्हिडीओ...

US President Election: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Manish Jadhav

US Presidential Election 2023: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते सध्या 80 वर्षांचे आहेत.

बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्याचा आणि हिंसक निदर्शनाचा व्हिडिओ ट्विट करुन आपली उमेदवारी जाहीर केली.

व्हिडिओमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस बायडन यांच्यासोबत दिसत आहेत.

बायडन म्हणाले की, 'चार वर्षांपूर्वी मी निवडणूक लढवली तेव्हा मी म्हटले होते की, आम्ही अमेरिकेचा आत्मा वाचवण्यासाठी लढत आहोत. तो अजूनही तसाच आहे.

लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक पिढीला एक संधी असते. हे मूलभूत स्वातंत्र्यासाठी आहे. म्हणूनच मी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढवणार आहे.'

दुसरीकडे, 15 एप्रिल रोजी बायडन यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले होते. 2020 मध्ये देखील, बायडन यांनी 25 एप्रिल रोजीच आपली उमेदवारी जाहीर केली.

बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत

बायडन हे अमेरिकेच्या (America) इतिहासातील सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत. जर त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली तर त्यांची दुसरी टर्म संपल्यावर त्यांचे वय 86 असेल.

डॉक्टरांनी बायडन यांच्या प्रकृतीशी संबंधित टेस्ट केल्या आहेत. असे असतानाही त्यांची फेरनिवड हे ऐतिहासिक पाऊल आहे.

वृत्तानुसार, बायडन यांच्या मित्रपक्षांनी गेल्या वर्षीपासूनच आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी सुरु केली होती. बायडन यांच्या पत्नी जिल बायडन यांच्याही अनेक बैठका झाल्या आहेत.

त्यांचा निवडणूक (Election) प्रचार भारतीय वंशाच्या अनिता डन आणि जेन डिलन सांभाळत आहेत. पक्षाचे 2024 चे अधिवेशन शिकागो येथे होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बायडन यांची लढाई डोनाल्ड ट्रम्प आणि निक्की हेली यांच्याशी आहे

अमेरिकेत पुढील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 5 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाचे दोन मोठे चेहरे निक्की हेली यांनीही आपापले दावे मांडून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने दोनदा महाभियोग आणल्यानंतर ट्रम्प 2020 च्या निवडणुकीत डेमोक्रॅट जो बायडन यांच्याकडून हरले होते.

याशिवाय, दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे पुत्र मॅरियन विल्यमसन आणि रॉबर्ट केनेडी यांनीही आपला दावा मांडला आहे. या दोन्ही नेत्यांना निवडणुकीचा अनुभव नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT