Joe Biden In Ukraine: जो बायडन अचानक पोहोचले युक्रेनमध्ये, जागतिक राजकारणात मोठी खळबळ

American President Ukraine Visit: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या काही दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन अचानक राजधानी कीवमध्ये दाखल झाले.
Joe Biden  & Volodymyr Zelenskyy
Joe Biden & Volodymyr Zelenskyy Dainik Gomantak

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या काही दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन अचानक राजधानी कीवमध्ये दाखल झाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेते कीवच्या रस्त्यावरही दिसले, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 20-22 फेब्रुवारी रोजी पोलंडला भेट देणार आहेत. पोलंडचे पंतप्रधान मॅट्युझ मोराविकी यांच्याशी तिथे अमेरिकन सैन्याच्या संख्येत वाढ करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. पण त्याआधीच त्यांनी कीव गाठून सगळ्यांना चकित केले.

Joe Biden  & Volodymyr Zelenskyy
Russia-Ukraine War: भारत हे युद्ध थांबवणार? अमेरिकेने केले मोठे वक्तव्य

तसेच, 24 फेब्रुवारी रोजी युक्रेन-रशिया युद्धाला एक वर्ष पूर्ण होईल. अजूनही ग्राउंड झिरोची स्थिती धोकादायक आहे. झेलेन्स्की यांच्या जो बायडन यांच्याशी याआधीही भेटी झाल्या आहेत, परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कीवमध्ये पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.

त्याचबरोबर, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा म्हणजे रशिया (Russia) आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला अमेरिका युक्रेनला पाठिंबा देत राहील, असा संकेत आहे. पूर्व युक्रेनमधील लढाईने भयानक वळण घेतले असून रशिया युक्रेनच्या शहरांवर सातत्याने क्षेपणास्त्रे हल्ले करत आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि 1 जानेवारीला कीवमध्ये रशियन क्षेपणास्त्रांनी नागरी इमारती आणि घरांवर मारा केला.

Joe Biden  & Volodymyr Zelenskyy
Russia Ukraine War: ब्रिटनने युक्रेनला केलेली 'ही' मदत वाढवणार रशियाची डोकेदुखी...

दुसरीकडे, सोमवारी सकाळी शहरात एअर सायरन वाजले. मध्य कीवमधील अनेक महत्त्वाचे रस्ते रोखले गेले आणि मिनीबस आणि चिलखती वाहनांचा एक लांब काफिला शहराच्या मध्यभागी जाताना दिसला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी कीवमध्ये सांगितले की, युक्रेनला $500 दशलक्ष सैन्य पॅकेज मिळेल, जे मंगळवारी जाहीर केले जाईल.

Joe Biden  & Volodymyr Zelenskyy
Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धाचे 309 दिवस; रशियाकडून क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरूच

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागाराने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हवाला देत म्हटले की, रशिया नक्कीच हरेल. युक्रेनला (Ukraine) जी काही शस्त्रे हवी आहेत, ती त्यांना मिळतील. कोणतीही तडजोड होणार नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com