Illegal Indian Truck Drivers Arrested Dainik Gomantak
ग्लोबल

America: अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या 30 भारतीय ट्रक ड्रायव्हर्संना अटक; 'ऑपरेशन चेकमेट' अंतर्गत होणार हकालपट्टी

Operation Checkmate US Border Patrol: अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करुन ट्रक ड्रायव्हिंग करणाऱ्या भारतीय नागरिकांवर तेथील प्रशासनाने मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

Illegal Indian Truck Drivers Arrested: अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करुन ट्रक ड्रायव्हिंग करणाऱ्या भारतीय नागरिकांवर तेथील प्रशासनाने मोठी कारवाई केली. एका विशेष फेडरल ऑपरेशन अंतर्गत एकूण 52 जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये तब्बल 30 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकेत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या या सर्व आरोपींना लवकरच देशातून हाकलून दिले जाणार आहे.

'यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन' (CBP) ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अ‍ॅरिझोना राज्यातील युमा सेक्टरच्या सीमा सुरक्षा एजंटांनी 11 ते 15 मे दरम्यान 'ऑपरेशन चेकमेट' राबवले होते. या विशेष मोहिमेअंतर्गत अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या 52 जणांना ताब्यात घेण्यात आले, ज्यातील 36 जण प्रत्यक्ष व्यावसायिक ट्रक चालवताना रंगेहाथ पकडले गेले. या बेकायदेशीर ट्रक चालकांमध्ये 30 जण एकट्या भारतातील असून, उर्वरित 6 जण मेक्सिको, अल साल्वाडोर आणि रशिया या देशांमधील रहिवासी आहेत.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या काही चालकांकडे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि व्हर्जिनिया यांसारख्या प्रमुख राज्यांचे व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स (CDL) होते, तर काहींकडे कोणत्याही प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्सच उपलब्ध नव्हते. यातील बहुतांश लोकांकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळात मिळालेली वर्क परमिट होती. मात्र, ही कागदपत्रे आता वैध राहिलेली नाहीत. या सर्व नागरिकांविरोधात अमेरिकेच्या फेडरल कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात आली असून, त्यांची मायदेशी रवानगी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

अमेरिकन प्रशासनाच्या मते, 'ऑपरेशन चेकमेट'चा मुख्य उद्देश देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि व्यावसायिक वाहने चालवणाऱ्या लोकांचा शोध घेऊन सार्वजनिक सुरक्षा मजबूत करणे हा आहे. युमा सेक्टरचे प्रभारी मुख्य गस्त एजंट डस्टिन कॉडल यांनी सांगितले की, लायसन्स नसलेले आणि बेकायदेशीररीत्या राहणारे चालक रस्त्यांवर गंभीर अपघात घडवू शकतात, जे सार्वजनिक सुरक्षेसाठी मोठे आव्हान आहे. त्यामुळे अशा चालकांपासून रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली.

विशेष म्हणजे, अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या प्रशासनाने वाहतूक विभागाला अयोग्य आणि बेकायदेशीर परदेशी चालकांना व्यावसायिक ट्रक किंवा बस चालवण्यासाठी लायसन्स देण्यापासून रोखण्याचे कडक आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत कमर्शियल वाहने चालवताना झालेल्या अनेक जीवघेण्या अपघातांमध्ये भारतीय वंशाच्या ट्रक चालकांचा सहभाग असल्याचे समोर आले होते, ज्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने आता अवैध परदेशी चालकांविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT