The US Army bombed positions of Iran-backed militias in Syria and Iraq  
ग्लोबल

Viral Video: अखेर बदला घेतलाच! जॉर्डन हल्ल्याला प्रत्युत्तरार्थ अमेरिकेने सीरिया आणि इराकमध्ये 85 ठिकाणांवर हल्ले

Ashutosh Masgaunde

The US Army bombed positions of Iran-backed militias in Syria and Iraq on Friday night in response to a drone attack on a military base in Jordan:

जॉर्डनमधील लष्करी तळावर ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या सैन्याने शुक्रवारी रात्री सीरिया आणि इराकमधील इराण समर्थित मिलिशियांच्या ठिकाणांवर बॉम्बफेक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सीरियामध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मिलिशियाचे सहा दहशतवादी मारले गेले आहेत. त्यातील तिघे गैर-सिरियन होते.

अमेरिकेने शुक्रवारी इराक आणि सीरियामधील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि त्यांच्या समर्थित मिलिशियाशी संबंधित 85 हून अधिक लक्ष्यांवर प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले सुरू केले, असे अमेरिकन सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेच्या लष्करी हवाई हल्ल्यांमध्ये कमांड आणि कंट्रोल सेंटर, रॉकेट, क्षेपणास्त्र आणि ड्रोन स्टोरेज सुविधा तसेच लॉजिस्टिक आणि दारूगोळा पुरवठा साखळी सुविधांना लक्ष्य करण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकन सैन्याने 85 हून अधिक लक्ष्यांवर 125 हून अधिक युद्ध सामग्रीसह हल्ले केले. त्याच वेळी, सीरियाच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की, सीरियाच्या वाळवंटी भागात आणि इराकच्या सीमेजवळ असलेल्या लक्ष्यांवर अमेरिकन हल्ल्यात अनेक लोक ठार आणि जखमी झाले आहेत.

इराण समर्थक दहशतवादी गटांच्या तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन म्हणाले की, अमेरिकेला मध्यपूर्वेमध्ये संघर्ष नको आहे, परंतु जर अमेरिकेचे कोणतेही नुकसान झाले तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ.

गेल्या आठवड्यात जॉर्डनमधील लष्करी तळावर ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले होते तर सुमारे 40 जण जखमी झाले होते. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इराण समर्थित गटांवर बदला घेण्याबाबत बोलले होते. अलीकडेच, बिडेन यांनी प्रत्युत्तराच्या हल्ल्याला मान्यता दिली होती. यानंतर अमेरिकेने शुक्रवारी पहिला हल्ला केला.

मात्र, अमेरिकन सैन्याने इराणच्या हद्दीतील कोणत्याही ठिकाणाला लक्ष्य केलेले नाही. मात्र अमेरिकेच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

गाझामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धामुळे या भागात आधीच तणावाची परिस्थिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT