India Maldives Relations: भारताशी पंगा घेणाऱ्या मोइज्जू सरकारची 'या' मुद्यावर सहमती; दिल्लीत दोन्ही देशांदरम्यान खलबतं!

India Maldives Tension: मालदीवचे चीन धार्जिणे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांच्या बाष्कळ वक्तव्यामुळे भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या कमालीचे ताणले आहेत.
Prime Minister Narendra Modi and Mohamed Muizzu
Prime Minister Narendra Modi and Mohamed MuizzuDainik Gomantak

India Maldives Tension: मालदीवचे चीन धार्जिणे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांच्या बाष्कळ वक्तव्यामुळे भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या कमालीचे ताणले आहेत. यातच आता, मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याबाबत दोन्ही देशांदरम्यान शुक्रवारी दिल्लीत चर्चेची दुसरी फेरी पार पडली. चर्चेनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.

यानुसार, मालदीवमधील लोकांना मानवतावादी मदत आणि वैद्यकीय बचाव सेवा प्रदान करणारे इंडियन एव्हिएशन प्लॅटफॉर्म कार्यरत राहिला पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे. मात्र, मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला आहे की नाही हे या निवेदनात स्पष्ट झालेले नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पुढील बैठक आता माले येथे होणार आहे. त्याची तारीख दोन्ही पक्षांच्या संमतीने ठरवली जाईल.

मोदी आणि मुइज्जू यांच्यात चर्चा झाली

दरम्यान, डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे (Maldives) अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यात दुबईतील COP28 शिखर परिषदेच्या वेळी झालेल्या बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी कोअर ग्रुप तयार करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यात मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताला 15 मार्चपर्यंत देशातून आपले लष्कर मागे घेण्यास सांगितले होते. सध्या, सुमारे 80 भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये आहेत.

Prime Minister Narendra Modi and Mohamed Muizzu
India-Maldives Relations: भारत-मालदीव संबंधांवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुइज्जू सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. पदभार स्वीकारल्यानंतर, चीन धार्जिण्या मुइज्जू यांनी भारताविरोधात गरळ ओकली होती. मोइज्जू म्हणाले होते की, ते भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना देशातून काढून टाकून त्यांचे निवडणूक वचन पूर्ण करतील. मुइज्जू (45) यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारत (India) समर्थक उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला होता. मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रातील भारताचा प्रमुख सागरी शेजारी देश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com