Israel Air Strike: इस्रायलचं 'ऑपरेशन तेहरान'! महाभयंकर हवाई हल्ल्यात इस्लामिक जिहादच्या नेत्यांसह इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाला केलं टार्गेट

Ali Larijani Targeted by Israel: इस्रायली संरक्षण दलाने (IDF) मंगळवारी (17 मार्च) पहाटे इराणमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भीषण हवाई हल्ला केला.
Ali Larijani Targeted by Israel
Ali Larijani Dainik Gomantak
Published on
Updated on

Israel Air Strike In Iran: इस्रायली संरक्षण दलाने (IDF) मंगळवारी (17 मार्च) पहाटे इराणमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भीषण हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्याचे मुख्य लक्ष्य इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारिजानी हे होते. इस्रायली प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, लारिजानी यांच्या ठिकाणांना लक्ष्य करुन हा हल्ला करण्यात आला असला तरी अद्याप ते जखमी आहेत की त्यांचा मृत्यू झाला आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, आयडीएफचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टिनेंट जनरल एयाल जमीर यांनी या ऑपरेशनला दुजोरा देताना मोठी मोहीम फत्ते झाल्याचे संकेत दिले आहेत. या हल्ल्याचे परिणाम येणाऱ्या काळात स्पष्टपणे दिसतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इस्रायलने (Israel) केवळ लारिजानी यांनाच लक्ष्य केले नाही, तर तेहरानमध्ये आश्रयाला असलेल्या पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचा नेता अक्रम अल-अजूरी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अड्ड्यांवरही जोरदार प्रहार केला. गाझा आणि वेस्ट बँकमधील दहशतवादी कारवायांचे नियोजन करणारे हे अधिकारी इराणमधील एका 'सेफ हाऊस'मध्ये लपल्याची खात्रीलायक माहिती इस्रायलला मिळाली होती. इस्रायलने आपल्या सीमांच्या सुरक्षेसाठी इराणमध्ये घुसून अशा प्रकारचे नेटवर्क उद्ध्वस्त करणे सुरुच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. या कारवाईला अलीकडच्या काळातील इराणविरुद्धची सर्वात मोठी लष्करी कारवाई मानले जात आहे.

Ali Larijani Targeted by Israel
Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

दुसरीकडे मात्र, हल्ल्याची व्याप्ती केवळ तेहरानपुरती मर्यादित नसून, इस्रायली हवाई दलाने इराणच्या (Iran) विविध शहरांमधील लष्करी पायाभूत सुविधांवर डझनभर क्षेपणास्त्रे आणि बॉम्बचा वर्षाव केला. आयडीएफने अधिकृतपणे जारी केलेल्या नकाशांनुसार, तेहरानमधील कमांड सेंटर, ड्रोन आणि बॅलिस्टिक मिसाइल साठवणुकीची केंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली. तसेच दक्षिणेकडील शिराज आणि उत्तर-पश्चिमेकडील तबरीज यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमधील इराणची हवाई संरक्षण यंत्रणा निकामी करण्यात आली. या हवाई हल्ल्यांनंतर इस्रायलने इराणच्या हवाई क्षेत्रावर आपले वर्चस्व निर्माण केले असल्याचा दावा केला.

Ali Larijani Targeted by Israel
Iran US War: ''सार्वभौमत्वावर घाला घालाल तर...'' इराणी राष्ट्राध्यक्षानं ट्रम्पला दिला सज्जड दम; 'आर-पार'च्या लढाईचा व्यक्त केला निर्धार!

विशेष म्हणजे, या हल्ल्याच्या अवघ्या एक दिवस आधी अली लारिजानी यांनी मुस्लिम देशांना एक संदेश देऊन अमेरिका आणि इस्रायलविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. शेजारील देशांमध्ये अमेरिकन तळ असताना इराण शांत बसू शकत नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली होती. या संघर्षाला त्यांनी अमेरिका-इस्रायल विरुद्ध मुस्लिम जगतातील प्रतिरोधक शक्ती असा रंग देण्याचा प्रयत्न केला होता. सध्या इराणने या हल्ल्याबाबत आणि लारिजानी यांच्या प्रकृतीबाबत मौन बाळगले असले तरी, या घटनेमुळे मध्यपूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला असून मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com