Iran-America Tensions: ''आम्ही युद्ध सुरु करत नाही, पण...''; इराणने पुन्हा भरला अमेरिकेला दम

Ibrahim Raisi: एकीकडे रशिया-युक्रेन तर दुसरीकडे इस्त्रायल-हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे.
Ibrahim Raisi
Ibrahim RaisiDainik Gomantak

Ibrahim Raisi Warns America Says We Will End The War: एकीकडे रशिया-युक्रेन तर दुसरीकडे इस्त्रायल-हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, सीरियाच्या सीमेला लागून असलेल्या जॉर्डन भागात ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले. या घटनेसाठी अमेरिकेने इराणला जबाबदार धरले असून बदला घेण्यासाठी अमेरिका कधीही हल्ला करु शकतो अशी चर्चा आहे. ही नवीन युद्धाची सुरुवात असू शकते. या हल्ल्यांसाठी अमेरिकन प्रशासनाने लष्कराला खुली सूट दिली आहे. या बातम्यांनंतर इराणनेही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी म्हणाले की, ''इराण कधीही युद्ध सुरु करणार नाही, परंतु युद्ध सुरु झाल्यानंतर निश्चितपणे संपवेल. जे आम्हाला युद्धासाठी प्रवृत्त करु इच्छितात त्यांना आम्ही सोडणार नाही.''

दरम्यान, इब्राहिम रायसी यांच्या वक्तव्यामुळे अमेरिका सीरिया आणि इराकमधील इराणी लक्ष्यांवर कधीही हल्ला करु शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. गेल्या शनिवारी झालेल्या हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले होते तर 40 हून अधिक जखमी झाले होते. अमेरिकन सरकारने मान्यता दिल्याचे सीबीएस न्यूजचे वृत्त आहे. अहवालानुसार, अमेरिकेने केलेले हल्ले अनेक दिवस टिकू शकतात. असे झाल्यास पश्चिम आशियामध्ये नवे युद्ध सुरु होऊ शकते. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे हा प्रदेश आधीच त्रस्त आहे.

Ibrahim Raisi
Iran-America Tension: इराणच्या 'सर्वात शक्तिशाली ठिकाणी' मोठा स्फोट, अमेरिकेसोबतचा वाढू शकतो तणाव

इब्राहिम रायसी म्हणाले की, 'आम्ही पहिल्यांदा युद्ध सुरु करु इच्छित नाही, परंतु कोणीन आम्हाला चेतावणी दिली तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ.' एका भाषणादरम्यान ते पुढे म्हणाले की, 'जेव्हा अमेरिकन राज्यकर्त्यांना आमच्याशी बोलायचे होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की आमच्याकडे लष्करी पर्यायही आहे.' ते पुढे म्हणाले की, 'इराण कधीही कोणत्याही देशासाठी धोका नाही. या भागातील सर्व देशांची सुरक्षा मजबूत राहावी आणि त्यांना कोणतीही हानी पोहोचू नये, अशी आमची इच्छा आहे.' वास्तविक, इराण स्वतः इराक, सीरियासह अनेक देशांवर हल्ले करत आहे आणि अमेरिकन सैन्याला लक्ष्य करत आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com