Hinglaj Mata Mandir destoyed in Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Video: युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या हिंगलाज मातेचे मंदिर पाकिस्तानी कोर्टाच्या आदेशानंतर पाडले

Hinglaj Mata Tmple: मिठी शहर हे पाकिस्तानातील हिंदूबहुल क्षेत्र आहे. येथे मोठ्या संख्येने हिंदू समाजाचे लोक राहतात. हिंदूबहुल मिठी शहर पाहण्यासाठी संपूर्ण पाकिस्तानातून लोक येतात.

Ashutosh Masgaunde

The temple of Hinglaj Mata, which is on the list of UNESCO heritage sites, was demolished following a Pakistani court order:

सिंधमधील हिंगलाज मातेचे मंदिर पाडण्यात आल्याने पाकिस्तानातील हिंदूं नागरिक कोण्यत्या स्थितीती असतील याचा अंदाज येतो. न्यायालयाच्या आदेशानंतर हिंदू मंदिर पाडण्याची कारवाई करण्यात आली.

यावेळी तेथे उपस्थित हिंदू नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत मंदिर पाडल्याचा तीव्र निषेध केला.

पाकिस्तानात यापूर्वीही गैर-मुस्लिमांविरोधात अशा प्रकारच्या मोहिमा होत आहेत. त्याचबरोबर हिंदू आणि शीख समाजाच्या धार्मिक स्थळांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांवर पाकिस्तान सरकारकडून कोणतेही ठोस निर्णय घेतले जात नाहीत. सरकार मूक प्रेक्षक राहिले आहे. यामुळे हिंदूंच्या तसेच शीख धर्माच्या लोकांच्या भावना सतत दुखावल्या जातात.

ताज्या प्रकरणात पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मानवाधिकार उल्लंघनाचे प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांनी एका हिंदू मंदिराला लक्ष्य केल्याची माहिती आहे.

याअंतर्गत न्यायालयाच्या आदेशानंतर सिंध प्रांतातील हिंगलाज माता मंदिर पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे.

मिठी शहरातील मंदिर पाडण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत थारपारकर जिल्हा अधिकार्‍यांनी सांगितले. मिठी शहर हे पाकिस्तानातील हिंदूबहुल क्षेत्र आहे. येथे मोठ्या संख्येने हिंदू समाजाचे लोक राहतात. हिंदूबहुल मिठी शहर पाहण्यासाठी संपूर्ण पाकिस्तानातून लोक येतात.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ट्विट करून या प्रकरणाची माहिती दिली आहे. अतिक्रमणाचे कारण देत थारपारकरच्या मिठीमध्ये 'हिंगलग माता मंदिर' पाडण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे.

दानिश कनेरियाने ट्विटमध्ये लिहिले की, “पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून हिंदू धार्मिक स्थळांवर कारवाई सुरूच आहे. मिठी, थारपारकर, पाकिस्तानमधील हिंगलाज माता मंदिर मीरपूरखासच्या अतिक्रमण विरोधी न्यायालयाच्या आदेशानंतर पाडण्यात आले आहे.

सीएनएन न्यूजच्या वृत्तानुसार, एलओसी म्हणजेच नियंत्रण रेषेजवळ हिंदूंचे आणखी एक धार्मिक स्थळ शारदा पीठ मंदिर पाडण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या संरक्षण आदेशानंतरही हे मंदिर पाडण्यात आले. मंदिराजवळ एक कॉफी हाऊस बांधले जात असून, त्याचे उद्घाटन यावर्षी होणार आहे.

पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार ही काही नवीन घटना नाही. येथे राहणाऱ्या हिंदूंना सतत आव्हानांचा सामना करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT