Irish Writer Paul Lynch Win Booker Prize 2023: आयरिश लेखक पॉल लिंच यांना 2023 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे. ‘प्रोफेट सॉन्ग’ या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. लंडनस्थित भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारु यांना हरवून तिने हा पुरस्कार जिंकला. ही कादंबरी एका कुटुंबाच्या कथेवर आधारित आहे. बक्षीस म्हणून त्यांना 50 हजार पौंडचे बक्षीस दिले जातील.
पुरस्कार जिंकल्यानंतर पॉल लिंच म्हणाले की, ''मी पश्चिमेकडील लोकशाही देशांमध्ये अराजकता पाहिली आहे. ते पुढे म्हणाले की, सीरियाची समस्या आणि निर्वासितांचे संकट ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या आहे. या सगळ्यात मानवी मूल्यांचा ऱ्हास होत आहे. लुप्त होत चाललेल्या मूलभूत हक्कांसाठी जगातील बड्या लोकशाही (Democracy) देशांना एकत्र यावे लागेल.'' हा पुरस्कार जिंकून ते आयर्लंडमधील पाचवे लेखक ठरले आहेत. त्यांच्या आधी जॉन बॅनवले, अॅन एनराइट, रॉडी डॉयल आणि आयरिश मर्डोक यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.
दरम्यान, 2022 बुकर पारितोषिक विजेते श्रीलंकन लेखक 'शेहान करुणाथिलाका' यांच्या हस्ते लिंचला हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी या पुरस्कारासाठी 6 मोठे दावेदार होते. केनियात जन्मलेल्या भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारु यांचाही त्यात समावेश होता. त्यांनी वेस्टर्न लेनवर आधारित कादंबरी लिहिली आहे.
मारुशिवाय जोनाथन एस्कॉफरीचं 'इफ आय सर्व्हायव्ह यू', सारा बर्नस्टीनचं 'स्टडी फॉर ओबेडिअन्स', पॉल हार्डिंगचं 'द अदर इडन' हे चित्रपट या पुरस्काराचे दावेदार होते. अंतिम यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व लेखकांना 2,500 पौंडांची रक्कम दिली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.