Musical Instruments Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानात तालिबानची दडपशाही, संगीतकारांसमोरचं जाळली म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स

पक्तियामधील (Paktia) एका संगीतकाराच्या वाद्ययंत्राला तालिबान्यांनी आग लावली. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये संगीतकार आपले वाद्य जळताना पाहून रडताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधील अशरफ घनी यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. सत्तेमध्ये आल्यानंतर अफगाण नागरिकांवर तालिबानने निर्बंध घालण्यास सुरुवातच केली आहे. यातच आता पक्तियामधील एका संगीतकाराच्या वाद्ययंत्राला तालिबान्यांनी (Taliban) आग लावली. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये संगीतकार आपले वाद्य जळताना पाहून रडताना दिसत आहे. अफगाणिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार अब्दुलहक ओमेरी (Abdulhaq Omeri) यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये बंदूकधारी एक व्यक्ती संगीतकारावर हसताना दिसत असून दुसरा त्याच्या 'दयनीय स्थिती'चा व्हिडिओ बनवत आहे.

ओमेरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "तालिबान संगीतकारांची वाद्ये जाळत आहे, ज्यावर संगीतकार रडत आहे." पक्तिया प्रांतातील जझाई अरब जिल्ह्यात ही घटना घडली. अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यापासून तालिबानने आतापर्यंत अनेक गोष्टींवर बंदी घातली आहे. ऑक्टोबरमध्ये एका हॉटेल मालकाने वृत्तसंस्थेला स्पुतनिकला सांगितले की, तालिबान्यांनी विवाहसोहळ्यांमध्ये थेट संगीतावर बंदी घातली होती.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या हेरात (Herat) प्रांतातील कपड्यांच्या दुकानांमध्ये तालिबानने पुतळ्यांचा (डमी) शिरच्छेद करण्याचे आदेशही दिले आहेत, असेही स्पुतनिक वृत्तसंस्थेने अफगाण मीडियाच्या हवाल्याने म्हटले आहे. हे शरिया कायद्याचे उल्लंघन असल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. काबूलच्या (Kabul) रस्त्यांवर अशा घटनांच्या खुणा पुन्हा दिसू लागल्या आहेत.

तसेच, तालिबानच्या वर्च्यु प्रमोशन आणि व्हाईस ऑफ प्रिव्हेंशन मंत्रालयाने देखील धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली ज्यात अफगाणिस्तानच्या टीव्ही चॅनेल, नाटके आणि सोप ऑपेरा स्त्रियांना दाखवण्यास बंदी घातली आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही असे या गटाने म्हटले असले तरी, इतिहासाने हे दाखवून दिले आहे की हा गट देशात मूलगामी शरिया कायद्याची आवृत्ती अंमलात आणण्यासाठी वचनबद्ध आहे. 20 वर्षांनंतर तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याने, अतिरेकी गटाच्या राजवटीत अफगाण महिलांना अनिश्चित भविष्याचा सामना करावा लागू शकतो यावर तज्ञ सहमत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT