Islamic State Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानमधील 'या' भागात पाय ठेवायला अजूनही घाबरतोय तालिबान !

तालिबान (Taliban) संपूर्ण अफगाणिस्तानवर (Afghanistan) आपले नियंत्रण असल्याचा दावा सातत्याने करत आला आहे.

दैनिक गोमन्तक

तालिबान (Taliban) संपूर्ण अफगाणिस्तानवर (Afghanistan) आपले नियंत्रण असल्याचा दावा सातत्याने करत आला आहे. परंतु अफगाणिस्तानमध्ये असे एक ठिकाण आहे, जिथे तालिबान पाय ठेवायलाही घाबरत आहे. 15 ऑगस्ट रोजी देशाचा ताबा घेतलेल्या तालिबानसाठी काही भाग नो-गो-झोन बनला आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा नांगरहार (Nangarhar Province) हा प्रांत आहे. त्यावर इस्लामिक स्टेट खोरासान (ISIS-K) ने कब्जा केला आहे. इस्लामिक स्टेट (Islamic State) या जागतिक दहशतवादी संघटनेची ही अफगाणिस्तानस्थित शाखा आहे. ऑस्ट्रेलियन पत्रकार होली मॅके (Holly McKay) यांनी सांगितले की, इस्लामिक स्टेटचा नांगरहार प्रांतातील चपरहार जिल्ह्यात तळ आहे. येथून तो प्राणघातक हल्ले करतो.

दरम्यान, हे ठिकाण अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेटचा बालेकिल्ला आहे. पत्रकाराने एका गावकऱ्याचा हवाला देऊन सांगितले की, 'तालिबानच्या कब्जानंतर येथे (ISIS-K Areas) 20 हून अधिक मृतदेह सापडले आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हे कोणी केले आहे हे आम्हाला माहीत नाही.'' देशातील इतर भागांप्रमाणे येथेही महिला बुरख्याखाली राहतात. इतर गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, मृतांची संख्या 45 पेक्षा जास्त आहे. होली सांगतात की, दररोज एका व्यक्तीला घराबाहेर फेकून मारले जाते.

2015 पासून ISIS-K ची उपस्थिती

हाऊस गार्ड समिउल्लाह, जो सुमारे 23 वर्षांचा आहे, त्याने सांगितले की, 'इसिस 2015 पासून इथे आहे. तालिबान फक्त दिवसा दिसतात. ते रात्री तळाशी जमतात आणि त्यातून बाहेर पडत नाहीत. अगदी आधीच्या सरकारचे सैनिकही इथे दिवसा (Afghanistan and ISIS) राहत होते. त्यामुळे हा भाग नेहमीच इस्लामिक स्टेटचाच भाग राहीलेला आहे.'' चपरहारच्या तालिबान गव्हर्नरने या भागात काही इसिसचे दहशतवादी असल्याची कबुली दिली आहे. गव्हर्नर ऐनुद्दीन म्हणाले, 'इसिस इथे आहे, परंतु फारच कमी आहे. कदाचित ते कुठेतरी लपले असतील पण इथे तालिबानचा ताबा असून तो पूर्णपणे आमच्या ताब्यात आहे.

इस्लामिक स्टेटचे दहशतवादी राहतात

होली मॅके यांनी सांगितले की, तुम्ही चप्परच्या रस्त्यावरुन जाताच हे ठिकाण अधिक निर्जन दिसेल. तालिबानी चौक्या सापडणार नाहीत. येथे वाहतूक खूपच कमी आहे. इस्लामिक स्टेटचे दहशतवादी इथे राहतात. जेव्हा त्यांना एखाद्याला लक्ष्य करायचे असते, तेव्हाच ते घरातून बाहेर पडतात (ISIS Afghanistan Airport Attack). पाश्चिमात्य समर्थित सरकार पडल्यानंतर इस्लामिक स्टेटने देशात अनेक प्राणघातक हल्ले केले आहेत. शिया मुस्लिमांना लक्ष्य करुन त्यांनी मशिदींमध्ये आत्मघाती हल्ले केले होते. निर्वासन मोहिमेदरम्यानही काबूल विमानतळ आत्मघातकी हल्ल्याने हादरले. तालिबानचे म्हणणे आहे की, आम्ही इस्लामिक स्टेटवर नियंत्रण ठेवत आहोत, परंतु दररोजच्या हल्ल्यांमुळे तसे दिसत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT