Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

'...मी कुणासमोर झुकणार नाही: पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तानमधील (Pakistan) राजकीय संकट अधिक गडद होत चाललं आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमधील राजकीय संकट अधिक गडद होत चाललं आहे. मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट (MQM) आणि बलुचिस्तान अवामी पार्टी (BAP) विरोधी आघाडीत सामील झाल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमत गमावले आहे. याच पाश्वभूमीवर पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानी जनतेशी संवाद साधत आहे. मागील काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होत आहे. पाकिस्तानातील राजकीय घडामोडी अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. सध्या पाकिस्तानकडे दोन मार्ग आहेत, त्यापैकी आपल्याला एकाच मार्गाचा अवलंब करायचा आहे, असे इम्रान खान यांनी यावेळी म्हटले आहे. स्वाभिमान हा प्रत्येक देशाचा आत्मा असतो. स्वतंत्र देशात माझा जन्म झाला. राजकारणा जेव्हा आलो तेव्हा माझ्यासमोर तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्या म्हणजे न्याय, माणुसकी, स्वाभिमान. असेही त्यांनी म्हटले. (The Prime Minister of Pakistan Imran Khan addressed the people of Pakistan)

इम्रान खान म्हणाले, ''देशासाठी काही तरी करण्याची इच्छा असल्यामुळे मी राजकारणात आलो. जगभरात ऐकेकाळी पाकिस्तानच्या गौरवाची कहाणी सांगितली जात होती. मात्र आता मी देशाचे पतन होताना पाहत आहे. आता जगभरात पाकिस्तानचं नाव खराब होत चाललं आहे. पाकिस्तानी जनतेला कुणासमोर झुकण्याची वेळ येऊ देणार नाही. देशाची परराष्ट्र निती पाकिस्तानी नागरिकांसाठी आम्ही राबवण्याचे काम केले. ना कधी मी झुकणार ना माझ्या जनतेला झुकू देणार नाही. वर्ल्ड ट्रेडवर सेंटरवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात नव्हता. परंतु ज्यांच्याबरोबर युध्द आपण लढलो त्यांनीच पाकिस्तानवर निर्बंध लावले.''

खान पुढे म्हणाले, ''जेव्हा मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझ्या जवळच्या लोकांनी मला रोखले होते. देवाने मला सर्व काही दिले, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. मी एका ध्येयाने राजकारणात आलो. जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला तेव्हा माझ्यासमोर तीन ध्येये होती - न्याय, मानवता आणि स्वावलंबन. मी राजकारणात न्याय आणि स्वाभिमानासाठी आलो. मी कुणापुढेही झुकलो नाही, आणि माझ्या जनतेलाही झुकू देणार नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या विरोधात आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT