Walter J Lindner Dainik Gomantak
ग्लोबल

''रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत भारताला सल्ला देणार नाही''

रशियाकडून तेल खरेदी (Oil Purchase) करण्याबाबत जर्मनी भारताला ‘सल्ला’ देऊ इच्छित नाही.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड महिन्यांपासून युध्द सुरु आहे. याच पाश्वभूमीवर रशियाकडून तेल खरेदी (Oil Purchase) करण्याबाबत जर्मनी भारताला ‘सल्ला’ देऊ इच्छित नाही. दिल्लीस्थित जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर (Walter J Lindner) यांनी सोमवारी माध्यमाशी बोलताना ही माहिती दिली आहे. (The German ambassador said would not advise India on buying oil from Russia)

लिंडनर म्हणाले की, ''जो कोणी रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, तो युक्रेनमधील युद्ध संपवण्यास मदत करु शकतो. युरोपमधील अनेक देश रशियाच्या तेल आणि कोळशावर अवलंबून आहेत, हे कोणीच नाकारु शकत नाही. पुतीन एके दिवशी शेजारच्या देशावर हल्ला करतील हे आम्हाला माहीत नव्हते. आम्ही आधीच रशियाकडून होणारी आयात अनेक पटींनी कमी केली आहे. आम्हाला या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियन तेलावरील अवलंबित्व कमी करायचे आहे.''

त्याच वेळी, रशियापासून दूर राहण्याच्या दबावाकडे दुर्लक्ष करत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी शुक्रवारी सांगितले की, ''राष्ट्र हितासाठी आम्ही स्वस्त रशियन तेल खरेदी करत आहोत. भारतासाठी ऊर्जा सुरक्षा प्रथम आहे.''

तसेच, CNBC-TV18 वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, "आम्ही तेल खरेदी सुरु केली आहे. आम्हाला अनेक बॅरल मिळाले आहेत. मला वाटते की, सुमारे तीन-चार दिवसांचा पुरवठा होईल आणि तो पुढे सुरुच राहील."

दुसरीकडे, केंद्रीय तेल मंत्री हरदीप सिंग पुरी (Union Minister Hardeep Singh Puri) म्हणाले, ''युक्रेन (Ukraine) युद्ध सुरु झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांचा सामना करणाऱ्या भारतातील सरकारी तेल कंपन्या रशियन तेल खरेदी करत आहेत. भारताने पुढील तीन ते चार महिन्यांसाठी तेल वितरण करारावर घेण्याची व्यवस्था केली आहे. रशिया भारताला पूर्वीपेक्षा कमी दराने तेल विकत असून प्रति बॅरल सुमारे $35 ची सूट दिली जात आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

Goa Accident: झोप ठरली जीवघेणी...! ट्रक खाली झोपलेल्या अज्ञात व्यक्तीचा चिरडून मृत्यू; करासवाडा येथील घटनेनं हादरला गोवा

Seaweed Forests: गोव्याच्या किनाऱ्यावर 'समुद्री शेवाळाची जंगले' आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी..

SCROLL FOR NEXT