Accident News Dainik Gomantak
ग्लोबल

Accident News: रस्त्याच्या कडेला रक्ताचा सडा! 11 वर्षांच्या मुलाने पिकअपने चिरडले; 9 बौद्ध भिक्षूंचा मृत्यू, 13 जण गंभीर जखमी

Thailand Accident News: थायलंडच्या ईशान्य भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली.

Manish Jadhav

Thailand Accident News: थायलंडच्या ईशान्य भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. येथे एका अवघ्या 11 वर्षांच्या मुलाने पायी चाललेल्या बौद्ध भिक्षूंच्या समूहाला पिकअपने उडवले. या अत्यंत वेदनादायक आणि भीषण रस्ते अपघातात तब्बल 9 बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडमधील मुकदहन प्रांतातील एकूण 35 बौद्ध भिक्षूंचा एक समूह एकत्र येऊन एका धार्मिक यात्रेसाठी पायी निघाला होता.

या अपघाताबाबत अधिकृत माहिती देताना मुकदहन प्रांताचे गव्हर्नर वोरयान बूननारत यांनी सांगितले की, या भीषण अपघातात 5 भिक्षूंचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य 4 भिक्षूंनी रुग्णालयात उपचारादरम्यान आपले प्राण गमावले. याशिवाय अन्य 13 जणांना गंभीर दुखापत झाल्याने तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून, त्यापैकी तीन भिक्षूंची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

दरम्यान, हा अपघात इतका अकस्मात घडला की भिक्षूंना सावरण्याची संधीच मिळाली नाही. हा समूह अपघाताच्या अवघ्या 30 मिनिटांपूर्वीच उबोन रत्चाथानी प्रांतापर्यंतच्या 260 किलोमीटर लांबीच्या पायी प्रवासासाठी निघाला होता. 'रुआम जाई मुकदहन रेस्क्यू असोसिएशन' या स्थानिक बचाव पथकाने जारी केलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओमध्ये सर्व भिक्षू रस्त्याच्या कडेने एका रांगेत शिस्तीत चालताना दिसत आहेत, आणि त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका वेगवान पिकअपने त्यांना क्रूरपणे चिरडले.

या अपघातातून (Accident) सुदैवाने बचावलेल्या भिक्षूंनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी तो पिकअप दूरवरुनच नियंत्रण गमावलेल्या स्थितीत येताना पाहिला होता. वाहन अनियंत्रित होऊन रस्त्यावरुन घसरले आणि थेट त्यांच्या समूहाला येऊन धडकले.

या संपूर्ण प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे तो अपघातग्रस्त ट्रक एक 11 वर्षांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता. स्थानिक पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या या मुलाला सध्या आपल्या ताब्यात घेतले. मात्र, आरोपी हा कायद्यानुसार बालक असल्याने, बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच त्याची कायदेशीर चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. हा अपघात नेमका गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणामुळे, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. या भीषण घटनेमुळे संपूर्ण थायलंडसह जगभरातील बौद्ध बांधवांमध्ये तीव्र दुःख आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT