Thailand School Shooting: चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी हादरलं थायलंड! 18 वर्षांच्या माथेफिरुची अंधाधुंध फायरिंग; 22 मुलांसह 36 जणांचा मूत्यू VIDEO

Thailand School Shooting: थायलंडमधून पुन्हा एकदा काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली.
Thailand School Shooting
Thailand School ShootingDainik Gomantak
Published on
Updated on

Thailand School Shooting: थायलंडमधून पुन्हा एकदा काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली. देशाच्या दक्षिण भागातील सोंगखला प्रांतातील 'पातोंग प्रथान खीरी विट' शाळेत एका 18 वर्षीय माथेफिरुने घुसून अंधाधुंध गोळीबार केला. या घटनेत 22 निष्पाप मुलांसह 36 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हाट याई परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण थायलंडमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. जेव्हा शाळेत सुट्टीची वेळ झाली होती आणि मुले घरी जाण्याच्या तयारीत होती, नेमक्या त्याच वेळी हा शस्त्रधारी हल्लेखोर शाळेत शिरला आणि त्याने अंधाधुंध गोळीबार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, या बंदूकधाऱ्याने काही तासात 22 मुलांसह 36 जणांचा जीव घेतला. त्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेच्या इमारतीत ओलीस धरले होते. या हल्ल्यातून सुदैवाने बचावलेल्या एका सुरक्षा रक्षकाने दिलेल्या प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार, हल्लेखोराकडे 'M4 सबमशीन गन' सारखे अत्यंत घातक शस्त्र होते. त्याने सर्वात आधी शाळेच्या मुख्याध्यापकांवर गोळ्या झाडल्या, ज्यात ते गंभीर जखमी झाले. "हल्लेखोराच्या बंदुकीतील एक गोळी माझ्या पोटाला स्पर्श करुन गेली, पण मी थोडक्यात वाचलो," असे सांगताना सुरक्षा रक्षकाच्या डोळ्यात तो थरार दिसत होता.

Thailand School Shooting
Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच हाट याई पोलिसांनी आपल्या विशेष पथकासह शाळेला चारही बाजूंनी वेढा घातला. पोलिसांनी तातडीने परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आणि शाळेच्या इमारतीत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली. 18 वर्षांचा हा तरुण इतक्या घातक शस्त्रासह शाळेत का शिरला आणि त्याचा उद्देश काय होता, याचे गूढ अद्याप कायम आहे. थायलंडमध्ये शाळा आणि बालसंगोपन केंद्रांवर होणारे हे हल्ले चिंतेचा विषय बनले असून देशातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Thailand School Shooting
Thailand: थायलंडमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 20 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढू शकतो!

शाळेच्या परिसरात सध्या लष्करी छावणीचे स्वरुप आले असून, फॉरेन्सिक टीम आणि रुग्णवाहिकांची मोठी रांग लागली आहे. मृतांचा आकडा वाढत असून, जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हालवण्यात येत आहे. या घटनेने केवळ थायलंडच (Thailand) नव्हे, तर जगभरातील पालकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. पोलीस सध्या या हल्लेखोराच्या पार्श्वभूमीचा तपास करत असून तो या शाळेचा माजी विद्यार्थी होता का, याचाही शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com