Terror Attack In Sydney Mall Australia Dainik Gomantak
ग्लोबल

Sydney Terror Attack: सिडनीत दहशतवादी हल्ला, चार जणांचा मृत्यू; एक दहशतवादी ठार तर दुसऱ्याचा तपास सुरु

Sydney Mall stabbing Case: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Terror Attack In Sydney Mall Australia: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडनीतील एका शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार आणि चाकूने हल्ला केल्यानंतर या चार जणांचा मृत्यू झाला. सिडनी पोलीस या घटनेला दहशतवादी हल्ला मानत आहेत. हल्ल्यानंतर मॉलमध्ये एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावू लागले. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मॉलमध्ये अडकलेल्या हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

न्यू साउथ वेल्स स्टेट पोलिसांनी सांगितले की, संपूर्ण मॉलला घेरण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील अनेक पोस्ट्समध्ये लोक मॉलमधून सैरावैरा धावताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते, त्यापैकी एक ठार झाला आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे.

हल्लेखोर आले कुठून? तपास चालू आहे

रिपोर्टनुसार, हा दहशतवादी हल्ला बोंडी जंक्शन येथे झाला. सिडनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचा उद्देश कदाचित दुकानदारांना टार्गेट करण्याचा होता. मॉल कॅम्पसमध्ये आपत्कालीन सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकला, त्यानंतर लोक तेथून पळताना दिसले.

शॉपिंग सेंटर खचाखच भरले होते

न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितले की, शनिवारी दुपारी दुकानदारांनी खचाखच भरलेल्या वेस्टफील्ड बोंडी जंक्शन मॉल कॉम्प्लेक्समध्ये हा हल्ला झाला. सध्या मॉल बंद करण्यात आला असून पोलिसांनी लोकांना या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेसंदर्भात पोलीस तपास करत आहेत. हा हल्ला कुठून झाला आणि त्याचा हेतू काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT