Israel-Hamas War: इस्रायलचा पुन्हा एकदा गाझावर मोठा हल्ला; 14 पॅलेस्टिनी शरणार्थी ठार

Israel-Hamas War: गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने सुरु असलेले इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध लवकर संपेल असे काही वाटत नाही.
Israel Hamas War
Israel Hamas WarDainik Gomantak

Israel-Hamas War: गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने सुरु असलेले इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध लवकर संपेल असे काही वाटत नाही. युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान इस्रायलने पुन्हा एकदा गाझावर हल्ला केला आहे. इस्रायलने गाझामधील देर अल-बालाह आणि नुसिरत निर्वासित कॅम्पना लक्ष्य करुन अनेक हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात 14 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, इस्रायलने ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला हा हल्ला केला आहे. त्यामुळे आनंदाच्या उत्सवावर शोककळा पसरली आहे. गाझामधील रुग्णालयाबाहेर लोक रडताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 5 मुले आणि 2 महिलांचा समावेश आहे. अबू मोहम्मद युसूफ या पॅलेस्टिनीने सांगितले की, "इस्रायलने कॅम्प क्रमांक 2 वर मोठा हल्ला केला. माझा भाऊ, त्याच्या मुली, त्याच्या पत्नीसह अनेक लोक मारले गेले आहेत."

Israel Hamas War
Israel-Hamas War: इस्रायल-हमास संघर्षावर भारताने UN मध्ये पुन्हा मांडली भूमिका; भारतीय राजदूत रुचिरा कंबोज म्हणाल्या...

दुसरीकडे, गाझावरील इस्रायलची सततची कारवाई आणि मदत कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी हा हल्ला चुकीचा असल्याचे म्हटले. इस्रायलकडून युद्धविराम प्रस्तावाची इच्छाही व्यक्त केली. इस्रायलकडून होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे गाझाला मानवतावादी मदत पोहोचवण्यात भरपूर अडचणी येत आहेत. येथील 80 टक्क्यांहून अधिक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. तर दहा लाख लोक उपासमारीच्या वाटेवर आहेत.

इस्रायल आणि हमास यांच्यात पुन्हा युद्धविराम करण्यासाठी सध्या कैरोमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हमास आणि इस्रायलसमोर नवीन युद्धविराम प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यात सहा आठवड्यांचा लढाईचा विराम तसेच इस्रायलमध्ये बंदिस्त असलेल्या सुमारे 700 पॅलेस्टिनींच्या बदल्यात हमासकडून 40 इस्रायली ओलीसांची देवाणघेवाण समाविष्ट आहे. मात्र, या प्रस्तावात इस्रायलने आणखी ओलीस सोडण्याची मागणी केली आहे.

Israel Hamas War
Israel-Hamas War: इस्त्रायलचा मोठा निर्णय; गाझामधून परत बोलावले सैन्य; युद्धविरामासाठी ठेवली 'ही' अट

दुसरीकडे, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे गाझामधील लष्करी कारवाई कोणत्याही किंमतीत थांबवण्याच्या मनस्थितीत नाहीत. रफाहमध्ये जमिनीवर लष्करी कारवाई सुरु करण्याची तारीखही त्यांनी निश्चित केली आहे. 1.3 दशलक्षाहून अधिक विस्थापित पॅलेस्टिनींनी रफाहमध्ये आश्रय घेतला आहे आणि अशा परिस्थितीत इस्रायलने लष्करी कारवाई सुरु केली तर तिथे मोठा विध्वंस निश्चित आहे. इस्रायली बॉम्बहल्ल्यापासून वाचण्यासाठी लाखो पॅलेस्टिनी अनेक महिन्यांपासून राफाहमध्ये राहत आहेत.

Israel Hamas War
Israel-Hamas War: गाझावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी इस्रायली लष्कर घेतंय AI ची मदत; रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा

इजिप्त आणि गाझाच्या सीमेवर असलेले रफाह हे एकमेव क्षेत्र आहे, जिथे इस्रायली सैन्य अद्याप पोहोचलेले नाही. अशा परिस्थितीत येथे राहणारे लोक अजूनही सुरक्षित आहेत. इस्रायलने या भागात हवाई हल्ले केले असले तरी आता आयडीएफने राफाहमध्ये लष्करी कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, त्यांनी रफाह येथे इस्रायली सैन्य पाठवण्याची तारीखही निश्चित केली आहे. ते म्हणाले की, “मला कैरोमध्ये झालेल्या चर्चेचा तपशीलवार अहवाल मिळाला आहे. आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी सतत काम करत आहोत. आमची प्रमुख ध्येय- आमच्या सर्व ओलीसांची सुटका आणि हमासवर पूर्ण विजय मिळवणे. या विजयासाठी रफाहमधील दहशतवाद्यांचा खात्मा करणे आवश्यक आहे. हमासचे शेकडो सैनिक तिथे लपून बसले आहेत. त्यांना दूर करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com