Australia MP Lidia Thorpe: संसदेत अत्याचाराची बतावणी करणारी कोण आहे महिला खासदार, जाणून घ्या

Australia MP Lidia Thorpe: ऑस्ट्रेलियन महिला खासदार लिडिया थॉर्प यांनी संसदेत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
Australia MP Lidia Thorpe
Australia MP Lidia ThorpeDainik Gomantak
Published on
Updated on

Australia MP Lidia Thorpe: ऑस्ट्रेलियन महिला खासदार लिडिया थॉर्प यांनी संसदेत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. देशाची संसद महिलांसाठी सुरक्षित नाही, असे ते म्हणाल्या.

थॉर्प यांनी कंझर्वेटिव्ह पक्षाचे खासदार डेव्हिड वान यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. महिला खासदाराचे म्हणणे आहे की, तिच्याबद्दल असभ्य टिप्पण्या केल्या गेल्या, अनेक वेळा अयोग्यरित्या स्पर्श केला गेला. ऑस्ट्रेलियन संसदेत (Parliament) थार्प यांनी हे खुलासे केले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

दरम्यान, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार डेव्हिड वान यांनी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लिडिओ थॉर्प म्हणतात की, लैंगिक शोषणाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो. आपल्याला अत्यंत चुकीची वागणूक मिळाल्याचे लिडिओ यांनी रडत रडत सांगितले.

Australia MP Lidia Thorpe
Australian Parliament: 'संसदेत माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला...', रडत रडत ऑस्ट्रेलियन महिला खासदार म्हणाली

दुसरीकडे, लिडिया थॉर्प या ऑस्ट्रेलियाच्या (Australia) अपक्ष खासदार आहेत. 2020 पासून त्या व्हिक्टोरियाच्या खासदार आहेत. त्या ऑस्ट्रेलियन ग्रीन पार्टीतही होत्या, परंतु 2023 मध्ये त्यांनी पक्ष सोडला. ऑस्ट्रेलियामध्ये, लिडिओ थॉर्प या स्थानिकांचा आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्या नेहमीच आपल्या मतदारांसाठी नव-नवीन कार्यक्रम राबवत असतात.

माझ्यासारखे इतरही बळी ठरले

थॉर्प पुढे म्हणाल्या की, 'लैंगिक छळाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो.' आपल्या बाबतीत काय झाले ते मी सांगितले, असेही त्या म्हणाल्या.

Australia MP Lidia Thorpe
Russia-Ukrainr War: रशियातून बेलारूसला पोहोचले धोकादायक अणुबॉम्ब; मित्र देशाला हाताशी धरत पुतिन आखतायेत मोठा प्लॅन

थार्प पुढे म्हणाल्या की, 'माझ्याबाबतीत जबरदस्ती करण्यात आली. ऑफिसच्या गेटमधून बाहेर पडायला मला भीती वाटत होती. मला माहित आहे की, माझ्यासारख्या इतरही महिला खासदार पीडित आहेत, पण त्या त्यांच्या करिअरमुळे कधीच पुढे आल्या नाहीत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com