Afghan women
Afghan women Dainik Gomantak
ग्लोबल

'ती मंत्री होऊ शकत नाही, महिलांनी फक्त जन्म द्यावा'

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) अशरफ घनी यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर अखेर अंतरिम सरकार (Interim Government) स्थापन केले आहे. यातच आता तालिबान प्रवक्त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ''महिला मंत्री होऊ शकत नाहीत, त्यांचा जन्म फक्त जन्म देण्यासाठी झाला आहे''. 1990 च्या दशकात अफगाणिस्तानातील क्रूर राजवटीनंतर कट्टरपंथी तालिबानी सध्या करत असलेले दावे पूर्णत:हा खोटे आहेत. तालिबानचे प्रवक्ते सय्यद जकारुल्लाह हाशिमी (Syed Zakarullah Hashimi) यांनी नवीन अफगाणिस्तान सरकारमध्ये (Afghan Government) महिलांचा मंत्री म्हणून समावेश न करण्याबाबत टोलो न्यूजवर केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत.

हाशिमीने टोलो न्यूजला सांगितले, ''महिला मंत्री होऊ शकत नाही, तुम्ही तिला एकादी जबाबदारी दिली तर ती पेलू शकत नाही. त्यामुळे महिलांना मंत्रिमंडळात स्थान न देणेचं योग्य आहे. त्यांचा जन्म फक्त मुलांना जन्म देण्यासाठी झाला आहे. महिला आंदोलक "अफगाणिस्तानच्या सर्व महिलांचे प्रतिनिधित्व करु शकत नाही."

दरम्यान मुलाखतकाराने सांगितले की, अफगाणी महिला या समाजाचा एक हिस्सा आहेत. त्यावर तालिबानी नेते हाशीमने उत्तर दिले, "पण आम्ही त्यांना समाजाचा हिस्सा मानत नाही. गेल्या 20 वर्षांमध्ये अमेरिका आणि अफगाणिस्तानमधील त्याच्या कठपुतळी सरकार चालत होते.

शिवाय, मुलाखतकाराने हस्तक्षेप करत सांगितले की, तुम्ही सर्व महिलांवर वेश्याव्यवसायाचा आरोप करु शकत नाही. त्यावर प्रत्युत्तरादाखल हाशिमी म्हणाली, "माझा हेतू हा सर्व अफगाणी महिलासंबंधी नाही. चार महिला रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत, त्या अफगाणिस्तानच्या महिलांचे प्रतिनिधित्व करु शकत नाहीत. अफगाणिस्तान स्त्रिया मुलांना जन्म देतात, त्यांचा पालनपोषण करतात आणि इस्लामिक नैतिकतेबद्दल जागृत करतात "

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT