ताजिकिस्तानपासून पंजशीर 'डिस्कनेक्ट' जाणून घ्या, तालिबान का ठरतोय वरचढ

एनआरएफचे नेते अहमद मसूद (Ahmed Masood) यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टद्वारे तालिबानसमोर शांतता प्रस्ताव ठेवला होता, मात्र तालिबान्यांनी हा प्रस्ताव सपशेल नाकारला.
Panjshir
PanjshirDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबान (Taliban) सरकार स्थापन झाले आहे. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (NRF) म्हणजेच उत्तर अलायन्स तालिबान्यांनाचा प्रतिरोध करताना कमकुवत पडत आहे. जो देशातील आत्तापर्यंत अजिंक्य समजला जाणारा एकमेव प्रांतही आता कमकुवत होताना दिसत आहे. कारण, इतिहासात पहिल्यांदाच, उत्तर आघाडीची ताजिकिस्तानपासून पुरवठा होत असलेली रसद तालिबान्यांनी बंद केली आहे. तालिबान लढाख्यांनी पंजशीरमध्ये (Panjshir) प्रवेश करत ताबा मिळवल्याचा दावा केला. मात्र, दुसरीकडे नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (NRF) म्हणते की, तालिबान्यांच्या विरोधात सुरु असलेले युद्ध अजूनही संपलेले नाही.

एनआरएफचे नेते अहमद मसूद (Ahmed Masood) यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टद्वारे तालिबानसमोर शांतता प्रस्ताव ठेवला होता, मात्र तालिबान्यांनी हा प्रस्ताव सपशेल नाकारला. अमरुल्ला सालेह आणि अहमद मसूद ताजिकिस्तानला गेल्याचेही वृत्त आहे. पंजशीरमध्ये एनआरएफची परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही.

Panjshir
तालिबान सरकार स्थापनेनंतर जगभरातून प्रतिक्रिया, चीन समाधानी तर जर्मनी कठोर

दरम्यान, यावेळी तालिबानने पंजशीरला ताजिकिस्तानमधून रसद पुरवठ्याची लाइन बंद केली आहे. 1990 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला, तेव्हा ताजिकिस्तानपासून पंजशीर खोऱ्यापर्यंत पुरवठा लाइन चालू ठेवली होती. परंतु ही लाइन आता तालिबान्यांनी बंद केलयामुळे याचा परिणाम म्हणून खोऱ्यात उपस्थित असलेल्या राष्ट्रीय प्रतिरोध आघाडीला (एनआरएफ) अन्न आणि इंधनाव्यतिरिक्त शस्त्रे आणि दारूगोळा पुरवठा होत नाही.

यासोबतच तालिबानने काबूलकडून येणारा मुख्य रस्ताही बंद केला आहे. यामुळे खोऱ्यात जीवनावश्यक वस्तूंची भीषण टंचाई निर्माण होत होती. अमरुल्ला सालेह (Amarullah Saleh) यांनी हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला आहे. त्यांनी या प्रकरणी संयुक्त राष्ट्रांना पत्रही लिहिले आहे. घाटीत वैद्यकीय साहित्याचाही तुटवडा आहे. जुन्या मित्रांनी या कठीण काळामध्ये पंजशीरला एकटे सोडले आहे. अहमद मसूदने एका संदेशाच्या माध्यमातून कबूल केले आहे की, त्याने अमेरिकेसह काही देशांकडून शस्त्रे आणि इतर पुरवठ्याची मागणी केली होती, परंतु ती पूर्ण करण्यास त्यांना नकार देण्यात आला. खरं तर, नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (NRF) चे नेते अहमद मसूद यांच्या आधी त्यांचे वडील अहमद शाह मसूद यांना इराणपासून अमेरिकेपर्यंत अनेक देशांनी मदत केली होती. यामध्ये शस्त्रे आणि लष्करी उपकरणे तसेच इतर आवश्यक वस्तूंचा समावेश होता. परंतु त्यांचा मुलगा अहमद मसूदसोबत हे घडले नाही.

Panjshir
PAK मुळे तालिबान मध्ये फूट! मुल्ला बरादर आणि हक्कानी आमने-सामने

पंजशीरला जोडणारे रस्ते बंद असल्याने, अशा परिस्थितीत जर एखाद्याला पंजशीरमध्ये जायचे असेल तर त्याला शेजारच्या कपिला प्रांतातील पर्वतांमधून दूरचा प्रवास करावा लागेल. हा मार्ग अशाप्रकारचा नाही की, कोणत्याही प्रकारची लष्करी मदत पंजशीर खोऱ्यापर्यंत पोहोचवता येईल. कदाचित म्हणूनच इतर देशांनी पंजशीरला मदत देण्याचे नाकारले असेल.

याशिवाय, तालिबान्यांनी पंजशीरमध्ये इंटरनेट आणि टेलिफोन लाईन बंद केल्या आहेत. अशा परिस्थितीत योग्य माहिती जगासमोर येऊ शकत नाही. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (NRF) खोऱ्याच्या बाहेरुन कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त करु शकत नाहीत. प्रसारमाध्यमांच्या ब्लॅकआऊटमुळे तालिबानशी सुरु असलेल्या युद्धाबाबत बाहेर येणारी माहिती एकतर्फी स्वरुपाची आहे.

Panjshir
Afghanistan Government: मुल्ला हसन अखुंद होणार तालिबान सरकारचा प्रमुख

त्याचवेळी, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (एनआरएफ) चे सध्याचे नेते अहमद मसूद हे लंडनमधील किंग्ज कॉलेज आणि रॉयल मिलिटरी कॉलेजमधून उच्च शिक्षण प्राप्त केले असले तरी, त्यांचे वडील अहमद शाह मसूद यांच्यासारखे गनिमी कावाचे तंत्र विकसीत करु शकले नाहीत. सँडहर्स्ट, ब्रिटन. अहमद शाह मसूदच्या वेळी सोव्हिएत युनियनची लाल सेना आणि नंतर तालिबान कधीच पंजशीरवर कब्जा करु शकले नाही. यावेळी तालिबान पंजशीरवर सर्वशक्तिनीशी हल्ला करत आहे.

तसेच, पाकिस्तानी मदत देखील तालिबानच्या बाजूने गेम चेंजर ठरली आहे. अलीकडेच, पंजशीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने ड्रोन हल्ले केले. याबाबतची एनआरएफनेही याची पुष्टी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com