Ayman Al Zawahiri Dainik Gomantak
ग्लोबल

Taliban On Al-Zawahiri: जवाहिरीच्या मृत्यूवर तालिबानने अमेरिकेबाबत केले हे वक्तव्य

Ayman Al Zawahiri: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेने अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याला ड्रोन हल्ल्यात ठार केले आहे.

दैनिक गोमन्तक

Taliban condemns US drone strike in Kabul: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेने अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याला ड्रोन हल्ल्यात ठार केले आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जवाहिरीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. जवाहिरीचा मृत्यू हा दहशतवादी संघटना अल कायदासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. अफगाणिस्तानमध्ये अल कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीच्या हत्येनंतर तालिबानने प्रतिक्रिया दिली असून हल्ल्याचा निषेध केला आहे.

तालिबानने अमेरिकेबद्दल असे म्हटले

तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी कबूल केले की, '31 जुलैच्या रात्री काबूलच्या शेरपूर भागात हवाई हल्ला झाला आणि तपासात हा हल्ला अमेरिकन ड्रोनने केल्याचे समोर आले.' अफगाणिस्तानने अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याचा निषेध करत हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि दोहा कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

तालिबान आणि अमेरिका यांच्यातील दोहा करार काय आहे

कतारची (Qatar) राजधानी दोहा येथे 2020 मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात ऐतिहासिक शांतता करार झाला, ज्या अंतर्गत अमेरिकेला अफगाणिस्तानातून (Afghanistan) आपले सैन्य मागे घेण्यास वचनबद्ध करण्यात आले. तर दुसरीकडे, तालिबानने अमेरिकन सैन्यावरील हल्ले थांबविण्याचे मान्य केले. यानंतर, अमेरिकेने 202 साली आपले सर्व सैन्य मागे घेतले आणि तालिबाननेही त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात अल कायदासह इतर दहशतवादी संघटनांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचे मान्य केले.

9/11 हल्ल्यासाठी जवाहिरीने विमान हायजॅक केले होते

इजिप्शियन सर्जन अयमान अल-जवाहिरीने 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत (America) झालेल्या हल्ल्यासाठी 4 विमानांचे अपहरण करण्यात मदत केली होती. यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन्ही टॉवरवर 2 विमाने आदळली. त्याचवेळी तिसरे विमान अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनला धडकले, तर चौथे विमान शँकविले येथील शेतात कोसळले. या दहशतवादी हल्ल्यात सुमारे तीन हजार लोक मारले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT