Ayman al Zawahiri Killed: अल कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला ठार केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, 'अमेरिकेने काबूलमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात अल कायदा चीफ अयमान अल-जवाहिरी (Ayman al Zawahiri) मारला गेला आहे.' अमेरिकन अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-जवाहिरी 31 जुलै रोजी झालेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला.
दरम्यान, एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवाहिरीने काबूलमधील (Kabul) एका सेफहाऊसमध्ये आश्रय घेतला होता. यातच दोन हेलफायर मिसाईलने केलेल्या हवाई हल्ल्यात तो ठार झाला. 31 जुलै रोजी रात्री 9:48 वाजता त्याचा मृत्यू झाला.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी सोमवारी जवाहिरीच्या मृत्यूची माहिती दिली. 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यातही त्याचा हात असल्याचा दावा अमेरिकेकडून (America) करण्यात आला होता. ज्यात सुमारे 3000 लोक मरण पावले होते.
दुसरीकडे, अमेरिकन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रविवारी सकाळी अमेरिकेने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये जवाहिरी मारला गेला. त्यानंतर अधिकृतरित्या व्हाईट हाऊसमधून आपल्या भाषणात बायडन यांनी जवाहिरी मारला गेला असल्याचे सांगितले.
अलीकडेच, जवाहिरीच्या मृत्यूच्या अफवा अनेकदा पसरवल्या गेल्या. त्याचवेळी तो बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याचेही बोलले जात होते. वृत्तानुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, तालिबानी अधिकाऱ्यांना जवाहिरी काबूलमध्ये असल्याची माहिती होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.