Taliban Government strict restriction on Afghanistan journalists Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानची पत्रकारांवर 'संक्रात', अनेकांची हत्या तर महिला पत्रकारांना बसवलं घरी

150 अफगाण पत्रकारांच्या (Afghanistan Journalists) गटाने संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबानच्या धमकीपासून संरक्षण देण्याचे आवाहन केले आहे

दैनिक गोमन्तक

तालिबान (Taliban) अफगाणिस्तानवर(Afghanistan) ताबा मिळवल्यापासून आपल्या वचनाचे सतत उल्लंघन करत आहे.तालिबान (Taliban Government) आता सत्तेत आल्यानंतर नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे. यामध्ये महिला (Women's Journalists ) आणि मीडिया कर्मचाऱ्यांना सर्वाधिक त्रास दिला जात आहे. एवढेच नव्हे तर अनेक पत्रकारांची हत्या देखील करण्यात आली आहे. 150 अफगाण पत्रकारांच्या (Afghanistan Journalists) गटाने संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबानच्या धमकीपासून संरक्षण देण्याचे आवाहन केले आहे.(Taliban Government strict restriction on journalists)

अल अरेबिया पोस्टच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानमधील पत्रकार घाबरले आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये त्यांनी देशात पत्रकारितेची जी भावना निर्माण केली होती ती हळूहळू लुप्त होत आहे. माध्यमांच्या गटांवरही तालिबानचा प्रभाव दिसून येत आहे.खाजगी टीव्ही वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या आशयामध्ये बदल करण्यात आले आहेत. महत्त्वाच्या बातम्या बुलेटिन, राजकीय वादविवाद, मनोरंजन आणि मैफिलींसह परदेशी नाटकांची जागा आता तालिबान सरकारला हव्या असलेल्या कार्यक्रमांनी घेतली आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यापासून देशातील परिस्थिती नाटकीयरित्या बदलली आहे. काबूलमधील अफगाणिस्तान राज्य माहिती माध्यम केंद्राचे संचालक दावा खान मैनापाल यांची ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हत्या करण्यात आली होती. दोन दिवसांनंतर, पकतिया घाग रेडिओ पत्रकार तुफान ओमरची तालिबान लढाऊंनी हत्या केली. काबूल ताब्यात घेतल्यानंतर लगेचच तालिबान लढाऊ अनेक पत्रकारांचा शोध घेत आहेत. याशिवाय अनेक पत्रकारांवर अत्याचार झाले, तर काहींचे बळी गेले आहेत.

तालिबानी लढाऊंनी पत्रकारांकडून कॅमेरे आणि उपकरणे हिसकावल्याच्या आणि त्यांना लुटण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अफगाण लोकांच्या निषेधाचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना ताब्यात घेतले जात आहे आणि कडक कायद्यांतर्गत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल गेले आहेत .

एकीकडे पुरुष पत्रकारांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडले जात असतानाच , तालिबानने महिला पत्रकारांनी काम करू नये त्यांना घरीच राहण्यास सांगितले आहे. अहवालानुसार, तालिबानने स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर लगेचच दोन महिला चेवी अँकरवर बंदी घालण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र-मान्यताप्राप्त नानफा संस्था रिपोर्टर विदाऊट बॉर्डर्सच्या मते, काबूलमधील 108 वृत्तसंस्थांमध्ये 2020 मध्ये 4,940 कर्मचारी काम करत होते आणि त्यापैकी 1080 महिला होत्या, परंतु आता महिला पत्रकारांची संख्या 100 च्या खाली घसरली आहे.

तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यापासून अनेक माध्यमे बंद आहेत. त्याच वेळी, काही मीडिया हाऊसेस आहेत ज्यांनी आर्थिक संकट, प्रतिकूल वातावरण आणि तालिबानच्या धमक्यांना न जुमानता पत्रकारिता सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT