तालिबानचा उपपंतप्रधान आता जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये

त्याच वेळी, सूचीमध्ये, त्याला 'करिश्माई लष्करी नेता' आणि उदारमतवादी चेहऱ्याचे प्रतिनिधित्व म्हणून वर्णित केले गेले आहे.
Mullah Abdul Ghani Baradar
Mullah Abdul Ghani BaradarDainik Gomantak
Published on
Updated on

टाइम मॅगझिनने (Time Magazine) बुधवारी 2021 च्या 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली. ज्यात तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदार (Mullah Abdul Ghani Baradar) याचेही नाव समाविष्ट आहे. अफगाणिस्तानमध्ये स्थापन झालेल्या तालिबान्यांच्या अंतरिम सरकारमध्ये बरदार यांना उपपंतप्रधान पद (Deputy Prime Minister) देण्यात आले आहे.

त्याच वेळी, सूचीमध्ये, त्याला 'करिश्माई लष्करी नेता' आणि उदारमतवादी चेहऱ्याचे प्रतिनिधित्व म्हणून वर्णित केले गेले आहे. नेत्यांच्या या जागतिक यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee), सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden), उपाध्यक्ष कमला हॅरिस, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेघन यांचाही समावेश आहे. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Mullah Baradar in TIME Magazine List) आणि बरदार यांचीही प्रभावशाली नेत्यांच्या श्रेणीत नोंद झाली आहे. मॅगझिनने तालिबान नेत्याबद्दल लिहिले आहे, 'तालिबानने ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानात विजय मिळवला, तेव्हा ते बरादार यांनी घातलेल्या अटींवर आधारित होते.'

Mullah Abdul Ghani Baradar
अफगाणिस्तानात सध्या स्थापन केलेले सरकार तात्पुरते; तालिबान प्रवक्त्यांची माहिती

मोठा निर्णय घेणारा नेता

बरदार हे सर्व प्रमुख निर्णय घेत होते, ज्यात पूर्वीच्या सरकारमधील सदस्यांना देण्यात येणारी कर्जमाफी, तालिबान काबूलमध्ये प्रवेश करताना कोणतीही जीवीतहानी होऊ नये, शेजारील देशांना विशेषत: चीन आणि पाकिस्तान सरकारशी संबंध ठेवण्यास परवानगी देण्यासह सर्व प्रमुख निर्णय घेत होते. त्याचबरोबर ते शेजारील देशांच्या प्रमुखांशी वार्तालाप करत होते. तालिबानच्या शिष्टमंडळाने देशावर पूर्ण ताबा मिळवण्यापूर्वी चीनला भेट दिली होती (Taliban China Pakistan Relations). शिवाय तालिबानी नेते पाकिस्तानी अधिकाऱ्यांनाही भेटत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

Mullah Abdul Ghani Baradar
तालिबान सरकारचा आज होणारा शपथविधी रद्द

बरदार यांना शांत नेता म्हटले

टाइम मॅगझिनने बरदार यांच्याबद्दल पुढे म्हटले आहे, 'आता ते अफगाणिस्तानच्या भविष्यासाठी आधारस्तंभ म्हणून उभे आहेत. अंतरिम तालिबान सरकारमध्ये, त्यांना उपपंतप्रधान बनवण्यात आले आहे. मात्र शिर्षपद तालिबानचा संस्थापक अखुंदजादा यांच्याकडे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com