Bashar Al Assad Death Sentence Dainik Gomantak
ग्लोबल

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Bashar Al Assad Death Sentence Syria Court: सीरियातील एका कोर्टाने देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पदच्युत हुकूमशहा बशर अल-असद यांना मंगळवारी (11 ऑगस्ट) फाशीची शिक्षा सुनावल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली.

Manish Jadhav

Bashar Al Assad Death Sentence Syria Court: सीरियातील एका कोर्टाने देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पदच्युत हुकूमशहा बशर अल-असद यांना मंगळवारी (11 ऑगस्ट) फाशीची शिक्षा सुनावल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली. कोर्टाने असद यांना त्यांच्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ जुलमी राजवटीत आणि सीरियाई गृहयुद्धादरम्यान केलेले भीषण युद्ध गुन्हे तसेच मानवतेविरुद्ध केलेल्या अमानुष गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले.

डिसेंबर 2024 मध्ये बंडखोरांच्या उठावामुळे असद यांचे सरकार कोसळल्यानंतर आणि अहमद अल-शरा यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर, सीरियाच्या कोर्टाने असद यांच्याविरुद्ध दिलेला हा पहिलाच आणि ऐतिहासिक निकाल आहे. असद सध्या सीरियात नसून रशियात आश्रयाला असल्याने हा खटला त्यांच्या अनुपस्थितीत चालवण्यात आला. यासोबतच कोर्टाने असद यांचा चुलत भाऊ आणि डेरा प्रांताचा माजी राजकीय सुरक्षा प्रमुख आतिफ नजीब याला प्रत्यक्ष कोर्टात हजर करुन फाशीची शिक्षा सुनावली.

नजीब याला नियोजित हत्या आणि कैद्यांना दिलेल्या अमानुष यातनांसाठी दोषी धरण्यात आले. 2011 मध्ये सीरियात सुरु झालेल्या बंडाची पहिली ठिणगी याच डेरा प्रांतातून पडली होती, जिथे सुरक्षा दलांनी आंदोलकांवर हिंसक कारवाई केली होती.

बशर अल-असद यांनी 2000 मध्ये त्यांचे वडील हाफिज अल-असद यांच्या मृत्यूनंतर सीरियाची सत्ता हस्तगत केली होती आणि डिसेंबर 2024 मध्ये सत्ताच्यूत होईपर्यंत हुकूमशाही चालवली. 2011 मध्ये सुरु झालेल्या गृहयुद्धादरम्यान असद सरकारने स्वतःच्याच नागरिकांवर रासायनिक शस्त्रांचा वापर करणे, लोकांना बेपत्ता करणे आणि तुरुंगात डांबून अतोनात छळ करण्याचे गुन्हे केले. 2013 मध्ये दमास्कस जवळील पूर्व गूटा येथे झालेल्या सरीन गॅस हल्ल्यात असद सरकारचा थेट सहभाग उघड झाला होता, ज्यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी झाले होते.

सध्या सीरियातील अंतरिम सरकार जुन्या राजवटीतील क्रूर अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कायदेशीर पकड घट्ट करत आहे. याच कारवाईचा भाग म्हणून असद आणि त्यांच्या नातेवाईकांना ही कठोर शिक्षा झाली. काही आरोपी स्वतः न्यायालयात शरण येत आहेत, तर असद यांच्यासारख्या फरार नेत्यांवर त्यांच्या अनुपस्थितीत खटले चालवले जात आहेत. सीरियातील या स्थानिक न्यायालयाव्यतिरिक्त युरोपमधील विविध न्यायालयांमध्येही असद सरकारच्या जुन्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर मानवाधिकार उल्लंघनाचे खटले सुरु असून, सीरियातील जुलमी राजवटीचा आता कायदेशीर अंत होत असल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT