Donald Trump: 'मोजतबा खामेनेई 90 टक्के संपले!', डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; महिनाभराची युद्धबंदी एका रात्रीत हवेत विरली

Donald Trump Claims Mojtaba Khamenei 90 Percent Gone: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून देणारा एक अत्यंत मोठा दावा केला.
Donald Trump Claims Mojtaba Khamenei 90 Percent Gone
Donald Trump & Mojtaba Khamenei Dainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump Claims Mojtaba Khamenei 90 Percent Gone: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक हिंसक वळणावर पोहोचला. नुकतेच अमेरिकेने इराणच्या अनेक महत्त्वपूर्ण लष्करी तळांवर भीषण हल्ले करुन त्यांचे अतोनात नुकसान केले असून, याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. या चालू युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून देणारा एक अत्यंत मोठा दावा केला.

ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की, अमेरिका (America) आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमुळे इराणने आपली संपूर्ण लष्करी क्षमता आणि आघाडीचे सर्व कमांडर गमावले आहेत. इतकेच नव्हे तर, गेल्या आठवड्यात आपले वडील दिवंगत अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारात न दिसलेले इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई हे देखील या हल्ल्यांमध्ये '90 टक्के संपले' आहेत.

Donald Trump Claims Mojtaba Khamenei 90 Percent Gone
Donald Trump: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा!' डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी वृत्तपत्राचा इशारा; आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ

'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणच्या सद्यस्थितीवर कडक भाषेत भाष्य केले. ट्रम्प म्हणाले की, इराणकडे आता ना स्वतःचे नौदल उरले आहे ना हवाई दल; त्यांचे सर्व काही नष्ट झाले. इराणची अँटी-एअरक्राफ्ट यंत्रणा उद्ध्वस्त झाली असून त्यांचे सर्व प्रमुख नेते मारले गेले आहेत. तसेच त्यांचे सर्वात हुशार आणि सक्षम नेतृत्व आता या जगात राहिलेले नाही.

Donald Trump Claims Mojtaba Khamenei 90 Percent Gone
Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

ट्रम्प यांनी पुढे दावा केला की, अयातुल्ला अली खामेनेई हे युद्ध सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी मारले गेले, तर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई हा 28 फेब्रुवारीपासून सार्वजनिकरित्या कुठेही समोर आलेला नाही. अमेरिकेच्या हल्ल्यात मोजतबा गंभीर जखमी झाल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात आधीपासूनच होती, ज्यावर आता ट्रम्प यांनी शिक्कामोर्तब करत तो 90 टक्के संपल्याचे म्हटले.

Donald Trump Claims Mojtaba Khamenei 90 Percent Gone
Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

डोनाल्ड ट्रम्प यांचे हे वादग्रस्त आणि तितकेच आक्रमक विधान अशा वेळी आले, जेव्हा गेल्या वीकेंडला अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ले झाले. या नव्या हल्ल्यांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेली युद्धबंदी आता अधिकृतपणे संपुष्टात आली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी या संदर्भात अमेरिकन काँग्रेसला (संसद) अधिकृत सूचित केले की, गेल्या आठवड्यात इराणच्या लष्करी तळांवर झालेल्या अनेक हल्ल्यांनंतर आता इराणविरुद्धची थेट लष्करी कारवाई पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे पश्चिम आशियातील युद्धाचा भडका उडाला असून संपूर्ण जगात हाय-अलर्ट निर्माण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com