Sunil Bharti Mittal Dainik Gomantak
ग्लोबल

Honorary Knighthood मिळवणारे सुनील भारती मित्तल ठरले पहिले भारतीय; किंग चार्ल्स III द्वारे सन्मानित

Sunil Bharti Mittal: किंग चार्ल्स तिसरा यांनी भारत-ब्रिटन व्यापारी संबंध वाढवण्याच्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

Manish Jadhav

Sunil Bharti Mittal First Indian Citizen To Be Conferred Honorary Knighthood: भारती एंटरप्रायझेसचे (Bharti Enterprises) संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना बुधवारी यूकेचा सर्वोच्च पुरस्कार 'नाइट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर' (KBE) हा मानद नाइटहूड प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, सुनील भारती हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत. किंग चार्ल्स तिसरे यांनी भारत-यूके यांच्यातील व्यापारी संबंध वाढवण्याच्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

सुनील भारती मित्तल म्हणाले

पुरस्काराच्या घोषणेवर मित्तल म्हणाले की, "महामहिम राजे चार्ल्स यांच्याकडून मिळालेल्या या सन्माननीय मान्यतेबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. यूके आणि भारत यांच्यातील संबंध ऐतिहासिक आहेत. परस्पर सहकार्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधामध्ये दृढता आली आहे. याचा मला अभिमान आहे. भारत आणि यूके यांच्यातील आर्थिक आणि द्विपक्षीय व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी मी काम करत राहीन. या सन्मानाबद्दल मी यूके सरकारचे आभार मानतो.''

सुनील भारती मित्तल यांना 2007 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला

दरम्यान, KBE हा ब्रिटनमधील नागरिकांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. मानद KBE पुरस्कार परदेशी नागरिकांना दिला जातो. 2007 मध्ये, सुनील भारती मित्तल यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता. गेल्या वर्षी भारत G20 चा अध्यक्ष असताना, मित्तल यांनी B20 इंडिया ॲक्शन कॉन्सिल ऑन आफ्रिकन इकॉनॉमिक इंटिग्रेशनचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन यूनियन/युनेस्को ब्रॉडबँड आयोगाचे आयुक्त देखील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT