Michael Obama: राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी सत्ताधारी पक्षात बायडनऐवजी मिशेल ओबामा यांना पसंती

Barack Obama's Wife: रासमुसेन रिपोर्ट पोलमध्ये मतदान करणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या जवळपास निम्म्या नेत्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बिडेन व्यतिरिक्त मिशेल ओबामा यांना सर्वाधिक पसंती दर्शवली आहे.
Michelle Obama
Michelle ObamaDainik Gomantak
Published on
Updated on

Michelle Obama For US President:

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या जागी प्रमुख पर्याय ठरत आहेत.

रासमुसेन रिपोर्ट पोलमध्ये मतदान करणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या जवळपास निम्म्या नेत्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बिडेन व्यतिरिक्त मिशेल ओबामा यांना सर्वाधिक पसंती दर्शवली आहे.

नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी बिडेन व्यतिरिक्त इतर उमेदवार निवडण्यास सुमारे 48 टक्के लोकांनी सहमती दर्शवली आहे, तर 38 टक्के लोक असहमत आहेत. केवळ 33 टक्के लोकांनी मतदानात फेरबदलाचा अंदाज व्यक्त केला. मिशेल ओबामा यांना 81 वर्षीय जो बिडेन यांच्या जागा घेण्यासाठी 20 टक्के मते मिळाली.

या शर्यतीतील इतर दावेदारांमध्ये उपाध्यक्ष कमला हॅरिस, माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन, कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजम आणि मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर यांचा समावेश आहे. कमला हॅरिस यांना १५ टक्के तर हिलरी क्लिंटन यांनाही १५ टक्के मते मिळाली आहेत.

Michelle Obama
Bonus For Giving Birth: ऐकवे ते नवलचं! मुलं जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपन्या देताहेत 62 लाखांपर्यंत बोनस

मिशेल ओबामा यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा विचार करण्यासाठी वारंवार बोलावले जात आहे.

याआधी ओबामा यांनी आगामी निवडणुकांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या, "लोकांना असे वाटते की सरकार प्रत्यक्षात काहीही करते? आणि मी म्हणते की सरकार आपल्यासाठी सर्वकाही करते. आम्ही ही लोकशाही गृहीत धरू शकत नाही."

Michelle Obama
Israel Hamas War: ''माझ्या पत्नीला माहित होतं ती मरणार आहे...''; गाझातील या व्यक्तीने इस्रायली हल्ल्यात गमावले 103 नातेवाईक

2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत अध्यक्ष जो बायडन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पुन्हा लढत अपेक्षित आहे.

या काळात बायडन यांनी स्वतःला सर्वात योग्य उमेदवार असल्याचा दावा केला आहे. संभाव्य गुन्हेगारी शिक्षा असूनही आपण निवडणूक लढवणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com