Sri Lanka Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतुन साजिथ प्रेमदासा यांची माघार घेतली

President: राष्ट्रपतीपदासाठी तीन उमेदवारांची घोषणा

दैनिक गोमन्तक

सध्या श्रीलंका आर्थिक संकटाबरोबरच राजकीय अस्थिरतेशीही झुंजत आहे. श्रीलंकाचे माजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढला असून त्यांनी राजीनामाही दिला आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे त्यांचा पदभार स्वीकारला आहे.

श्रीलंकेत नव्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. 20 जुलै रोजी नवीन अध्यक्षाची निवड होणार आहे. दरम्यान, श्रीलंकेला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांनी माघार घेतली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. मला प्रिय असलेल्या माझ्या देशाच्या भल्यासाठी मी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीतून माघार घेतो, असे ट्विट त्यांनी केले आहे. असे ते म्हणाले.विरोधकांच्या सहकार्यासाठी आमचा पक्ष कठोर परिश्रम करेल.

यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला होता

यापूर्वी स्वत: सजिथ प्रेमदासा यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला होता. ते म्हणाले की या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आमच्याकडे निश्चितपणे योजना आहे. आम्ही तीन वर्षांपासून गोटाबाया सरकारला चुकीच्या सल्ल्याने आर्थिक पावले उचलू नका, असे सांगत होतो पण. त्यांनी आमचे ऐकले नाही आणि आपण उद्ध्वस्त अवस्थेत आहोत.

तीन उमेदवार जाहीर केले

सजिथ प्रेमदासा यांनी माघार घेतल्यानंतर श्रीलंकेच्या संसदेने राष्ट्रपतीपदासाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान आणि कार्यवाहक अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, दुल्लास अल्हापेरुमा आणि अनुरा कुमारा डिसनायके हे उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील.

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी

श्रीलंकेत काल पुन्हा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. कार्यवाह अध्यक्ष रोनिल विक्रमसिंघे यांनी हा आदेश दिला. आदेशात म्हटले आहे की, आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था आणि जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी १८ जुलैपासून आणीबाणी लागू करण्यात येत आहे. यापूर्वी 13 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात प्रचंड गदारोळ आणि जनक्षोभामुळे श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली होती.

राजपक्षे देशातून पळून गेल्यानंतर विक्रमसिंघे यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले आहे . यानंतर आणीबाणी उठवण्यात आली, मात्र आता आठवडाभरात दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT