Bus Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Bus Accident: भीषण अपघात! बस दरीत कोसळून 42 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

South Africa Bus Accident: दक्षिण आफ्रिकेच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात झालेल्या एका भीषण बस अपघातात 42 लोकांचा जागीच मृत्यू झाला.

Manish Jadhav

South Africa Bus Accident: दक्षिण आफ्रिकेच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात झालेल्या एका भीषण बस अपघातात 42 लोकांचा जागीच मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सोमवारी (13 ऑक्टोबर) या दुर्घटनेची माहिती दिली. राजधानी प्रिटोरियापासून सुमारे 400 किलोमीटर उत्तरेस असलेल्या लुई ट्रिचर्ड शहराजवळ N1 महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली.

बस दरीत कोसळली

रस्ते वाहतूक व्यवस्थापन महामंडळाचे प्रवक्ते सायमन जवाने यांनी 'न्यूज24' या वृत्तवाहिनीला माहिती देताना 42 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची संख्या मोठी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रांतीय सरकारने दिलेल्या माहितीनुसार, बस एका उंच डोंगराळ खिंडीजवळ रस्त्यावरुन घसरली (Slipped) आणि खोल दरीत कोसळली. ही बस दक्षिण आफ्रिकेच्या ईस्टर्न केप भागातून देशाच्या दक्षिणेकडे जात होती.

झिम्बाब्वे आणि मलावीचे नागरिक असल्याची शक्यता

लिम्पोपो (Limpopo) प्रांताच्या सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, अपघातग्रस्त बसमध्ये प्रामुख्याने झिम्बाब्वे आणि मलावी देशाचे नागरिक होते, जे आपल्या मायदेशी परतत असावेत. प्रांतीय सरकारने जखमींची नेमकी संख्या त्वरित सांगितली नसली तरी अनेक जीवित वाचलेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केले दुःख

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांनी या बस दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. रामफोसा म्हणाले, "हा अपघात अशा वेळी झाला आहे, जेव्हा आम्ही आमचा वार्षिक 'परिवहन महिना' (Annual Transport Month) साजरा करत आहोत आणि रस्त्यांवरील सुरक्षेच्या महत्त्वावर विशेष लक्ष देत आहोत. त्यामुळे हे दुःख आणखी वाढले आहे."

याआधीही मोठे अपघात

याच लिम्पोपो प्रांतात गेल्या वर्षी देखील एका भीषण बस अपघातात 45 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ती बस पुलावरुन घसरुन दरीत कोसळली होती आणि अपघातात केवळ 8 वर्षांची एक मुलगीच जिवंत वाचली होती. त्या बसमध्ये बोत्mbeve (Botswana) देशाचे नागरिक होते, जे इस्टर चर्चच्या समारंभासाठी दक्षिण आफ्रिकेत येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT