Hair Regrowth Serum Dainik Gomantak
ग्लोबल

20 दिवसांत टक्कल होणार गायब! वैज्ञानिकांनी बनवले केस उगवणारे चमत्कारी औषध; जाणून घ्या कसे करते काम

National Taiwan University Study: तैवानमधील नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी एक असे सीरम विकसित केल्याचा दावा केला आहे, जे '20 दिवसांत केस पुन्हा वाढवू शकते.'

Manish Jadhav

Hair Regrowth Serum: '10 दिवसांत वजन कमी करा' किंवा 'एका महिन्यात केस वाढवा' अशा चमत्कारी दाव्यांबाबत तुम्ही ऐकले किंवा वाचले असेलच. अशा बातम्या वाचताना तुम्ही-आम्ही सहसा त्याला जास्त महत्त्व देत नाही. मात्र, आता एका नव्या वैज्ञानिक संशोधनातून एक मोठा खुलासा झाला आहे.

तैवानमधील नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी एक असे औषध विकसित केल्याचा दावा केला आहे, जे '20 दिवसांत केस पुन्हा वाढवू शकते.' हे संशोधन 'सेल मेटाबॉलिझम' (Cell Metabolism) नावाच्या प्रसिद्ध वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनात उंदरांवर प्रयोग करण्यात आले असून त्वचेखालील फॅटी सेलमधून (Fat Cells) नैसर्गिकरित्या बाहेर पडणारे काही फॅटी ॲसिड (Fatty Acids) केसांच्या मूळ पेशींना केस पुन्हा वाढवण्यासाठी कसे उत्तेजित करतात, याचा अभ्यास करण्यात आला आहे.

संशोधनात काय आढळले?

संशोधकांनी दावा केला की, जेव्हा त्वचेला किरकोळ दुखापत होते, तेव्हा त्या भागातील फॅट सेल (Adipocytes) 'ओलिक ॲसिड' (Oleic Acid) आणि 'पामिटोलेइक ॲसिड' (Palmitoleic Acid) सारखे फॅटी ॲसिड बाहेर टाकतात. वैज्ञानिकांनी शोधून काढले की, हे रेणू निष्क्रिय असलेल्या केसांच्या मूळांना सक्रिय करण्यासाठी सिग्नल म्हणून काम करतात. याच फॅटी ॲसिडचा वापर जेव्हा वैज्ञानिकांनी उंदरांच्या त्वचेवर केला, तेव्हा केवळ 20 दिवसांत नवीन केस आल्याचे दिसून आले. या निकालांवरुनच '20 दिवसांत केस परत उगवण्याचे' दावे केले जात आहेत.

हे निष्कर्ष आशादायक?

सध्या केस पुन्हा वाढवण्यासाठी वापरले जाणारे मिनोक्सिडिल (Minoxidil) किंवा फिनास्टेराईड (Finasteride) यांसारखे उपचार रक्त प्रवाह किंवा हार्मोन नियमनावर लक्ष केंद्रित करतात. जर मानवांमध्ये हे सिद्ध झाले, तर ही फॅटी ॲसिड-आधारित पद्धत केस पुनरुत्पादनासाठी अधिक सुरक्षित आणि नैसर्गिक दृष्टिकोन ठरु शकते. कारण 'ओलिक ॲसिड' आणि 'पामिटोलेइक ॲसिड' हे जैतुणाचे तेल (Olive Oil) आणि सुका मेवा यांसारख्या नैसर्गिक स्रोतांमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहेत.

संशोधनाच्या मर्यादा आणि धोके

'20 दिवसांत केस परत मिळवण्याचा' दावा सध्या फक्त उंदरांवर केलेल्या प्रयोगावर आधारित आहे. उंदरांच्या केसांचे वाढीचे चक्र मानवांपेक्षा खूपच लहान असते. प्रयोगशाळेतील नियंत्रित परिस्थितीत जे घडते, ते 'टक्कल' (Baldness) पडलेल्या लोकांसाठी तंतोतंत लागू होईलच असे नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या संशोधनावर आधारित सीरमची मानवांवर सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी कोणतीही क्लिनिकल चाचणी (Clinical Trials) अजूनही करण्यात आलेली नाही. वैज्ञानिकांनी या शोधाचे पेटंट दाखल केले आहे आणि भविष्यात मानवांसाठी सीरम तयार करण्याच्या दिशेने ते काम करत आहेत.

केस गळतीच्या समस्येवर हे संशोधन एक नवीन आशा निर्माण करणारे असले तरी, 20 दिवसांत केस वाढतीलच, या दाव्यावर लगेच विश्वास ठेवणे योग्य नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सुरक्षितता आणि डोस निश्चित होईपर्यंत हे सीरम बाजारात आणण्यापूर्वी अजून खूप संशोधन होणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT