Sameer Panditrao
चीनच्या लष्करी दिनाच्या संचलनामध्ये चीनने आधुनिक शस्त्रे, ड्रोन आदी लष्करी सामर्थ्याचे दर्शन साऱ्या जगाला घडवले.
या संचलनात सर्वाधिक चर्चेचा ठरला तो ‘रोबो वुल्व्ह’ अर्थात ‘रोबोटिक लांडगा’. शत्रूवर एका मिनिटांत ६० गोळ्या झाडण्याची त्याची क्षमता आहे.
चीन साउथ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशनने तयार केलेले हे चार पायांचे मानवरहित जमिनीवरील यंत्र आहे.
शस्त्रे वाहून नेणे, दारूगोळ्याचा पुरवठा करणे, शत्रूच्या स्थानावर जाऊन तेथील पाहणी करणे आदी कामे या माध्यमातून केली जातील.
आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीमध्ये हा रोबो काम करतो. तो शिड्या चढू शकतो; तसेच डोंगराळ आणि खडकांचा प्रदेश सहज पार करू शकतो.
परेडदरम्यान झालेल्या प्रात्यक्षिकांमध्ये हा रोबो धुरातून वाट काढत असताना आणि रायफल घेऊन जाताना दिसला.
१०० मीटर अंतरावरून अचूक लक्ष्यभेद करण्याची त्याची क्षमता आहे.