Sameer Panditrao
चीनची तांत्रिक प्रगती अचंबित करणारी आहे. अवकाश तंत्रज्ञानापासून रोबोपर्यंत चीन वेगवेगळे प्रयोग करून नवे-नवे शोध लावत आहे.
आता चीन पुन्हा एकदा भविष्यकालीन तंत्रज्ञानासाठी चर्चेत आला आहे.
रस्त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या मानवीय रोबोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘लिटिल टायगर’ असे टोपणनाव असलेला हा या मानवीय रोबो शांघाय येथे एका वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करीत असलेला दिसत आहे.
हाताने इशारा करून तो वाहनचालकांना मार्गदर्शन करीत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
शांघाय नागरी सुरक्षा कक्षाच्या वाहतूक नियंत्रक व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा रोबो सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे.
शिआ हु (लिटिल टायगर) हे अधिकृत नाव. पांढरे हेल्मेट, एलईडी दिवे व परावर्तित पिवळे कपडे अशी वेशभूषा