Prince Mohammed bin Salman | Economic Crisis in Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Economic Crisis in Pakistan: बुडत्याला काडीचा आधार! पाकिस्तानची तिजोरी भरणार सौदी, क्राउन प्रिन्स...

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून मोठी आर्थिक मदत मिळण्याची आशा आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून मोठी आर्थिक मदत मिळण्याची आशा आहे. यामागे सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची खास घोषणा आहे.

आपल्या घोषणेमध्ये, मोहम्मद बिन सलमान यांनी आपल्या देशाची पाकिस्तानमधील गुंतवणूक 10 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याबाबत बोलले आहे.

यासोबतच, सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानमधील ठेवी पाच अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या शक्यतांचा विचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड आर्थिक संकट आहे. आयएमएफनेही (IMF) पाकिस्तानला मदत करण्यास नकार दिला आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी ही माहिती दिली

पाकिस्तानच्या मीडियामध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) क्राऊन प्रिन्सच्या घोषणेची माहिती देण्यात आली आहे.

सौदी प्रेस एजन्सीच्या हवाल्याने सौदी संवाद समितीने प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार, क्राउन प्रिन्स सलमान यांनी पाकिस्तानमधील सौदी अरेबियाची गुंतवणूक 10 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यासंबंधीच्या पैलूंवर लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या वर्षी 25 ऑगस्ट रोजी सौदी अरेबियाने आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमधील गुंतवणूक 10 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.

पाक लष्करप्रमुख नुकतेच सौदी अरेबियाला पोहोचले होते

सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सने सौदी डेव्हलपमेंट फंड (SDF) ला पाकिस्तानच्या (Pakistan) मध्यवर्ती बँकेतील ठेवींची रक्कम $ 5 अब्ज पर्यंत वाढवायची की नाही याचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. 2 डिसेंबर रोजी सौदी अरेबियाने 3 अब्ज डॉलर्सवरुन 5 अब्ज डॉलर्स ठेवण्याची घोषणा केली होती.

तसेच, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात संप्रेषण फ्रेमवर्क दरम्यान हे निर्देश आले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाचा दौरा पूर्ण केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT