S. Jayshankar Dainik Gomantak
ग्लोबल

Rahul Gandhi: भारताला कमीपणा दाखवून चीनचे कौतुक... जयशंकर यांचा राहुल गांधीवर हल्लाबोल

Rahul Gandhi: हा चीनचा प्रकल्प पीओकेमधून जातो.

गोमन्तक डिजिटल टीम

Rahul Gandhi: राहुल गांधीनी आपल्या कॅब्रीज दौऱ्यादरम्यान भारताविषय़ी त्यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर राहुल गांधींवर टीका केली जात आहे. आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींना धारेवर धरले आहे.

राहुल गांधींनी चीनने उत्पादनकार्यात मोठी प्रगती केली असे म्हटले. त्याचबरोबर, भारतातील मेक इन इंडिया अपयशी ठरल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. चीनच्या बेल्ट अॅंड रोड इनिशिएटिव्हचे कौतुक केले होते.

राहुल गांधींनी चीनचे कौतुक करताना भारताला कमी लेखले आहे. भारतासाठी त्यांनी कलह हा शब्द वापरला आहे तर चीनसाठी सदभाव हा शब्द वापरला आहे. भारतासाठी कोणी असे शब्द वापरत असेल तर अत्यंत दु:ख होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

चीन( China )च्या बेल्ट अॅंड रोड इनिशिएटिव्हचे कौतुक राहुल गांधींनी कौतुक केले आहे . मात्र हा चीनचा प्रकल्प पीओकेमधून जातो. भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवर हा प्रकल्पामुळे अडचणी निर्माण करु शकतो याबद्दल राहुल गांधींनी एक शब्दही का काढला नाही.

पुढे बोलताना एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, तुम्ही इतर देशाचे तर्कपूर्ण मूल्यांकन करु शकता यामध्ये काही वाईट नाही किंवा काही चुकीचेदेखील नाही मात्र आपल्या देशाला कमीपणा दाखवून इतर देशाची प्रशंसा करणे किती योग्य आहे?

तुम्ही म्हणता आम्ही चीनला घाबरलो आहोत पण मला तुम्हाला विचारायाचे आहे की, कोण कसे देशाचे मनोबल कमी करु शकते ? भारतीय होण्याच्या नात्याने भारताबद्दल असे विधान ऐकून वाईट वाटते असेही भारता( India )चे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT