Corona: चिनी वैज्ञानिकांकडून कोरोना फैलावण्याचं कारण आलं समोर, वटवाघूळ नव्हे तर...

चिनी वैज्ञानिकांनी दावा केला असून करोनाच्या फैलावासाठी वटवाघून नव्हे तर रॅकून हा प्राणी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
Corona
CoronaDainik Gomantak

Corona जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना व्हायरसने कित्येकांचा जीव घेतला. जे या कोरोना आजारातून बचावले त्यांना आज विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या कोरोनाचा फैलाव चीनमधूनच झाला या दाव्यावर अनेक देश ठाम आहेत. तसंच यासाठी वटवाघूळ (Bat) कारणीभूत असल्याचे दावेही करण्यात आले.

दरम्यान आता चिनी वैज्ञानिकांनी एक दावा केला असून करोनाच्या फैलावासाठी वटवाघून नव्हे तर रॅकून हा प्राणी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. करोनाच्या तीन वर्षानंतर चीनने हा दावा केला आहे. दरम्यान चीनने हा अभ्यास सार्वजनिक केला असला तरी त्यातील निरीक्षणं मात्र समोर आणलेली नाही.

करोनाचा फैलाव झाल्यानंतर चीनमधील सीफूड मार्केट बंद करण्यात आलं होतं. तिथे जनवारांनाही हलवण्यात आलं होतं. वैज्ञानिकांशी करोनाच्या कारणांचा शोध घेताना फरशी, पिंजरे आणि प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून नमुने घेतले होते.

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या CDC ने नुकताच एक डेटा अपलोड केला आहे. चीनमधून मिळालेल्या या डेटाचा अभ्यास केला जात आहे. NYT च्या रिपोर्टनुसार, जेनेटिक मटेरियल रॅकूनशी जुळत आहेत.

Corona
Imran Khan: पाकिस्तानात खूनी राजकारण, मरता-मरता वाचले इम्रान खान; वाचा नेमकं प्रकरण

मात्र सध्या तरी करोनाचा फैलाव होण्यासाठी वटवाघूळ किंवा रॅकून जबाबदार आहे सांगता येणार नाही. किंवा एखाद्या प्रयोगशाळेतून लीक झाला आहे असंही स्पष्ट सांगता येणार नाही. यामुळे योग्य विश्लेषण करणयात अनेक अडचणी येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com