Moon Mission Dainik Gomantak
ग्लोबल

Russia's Moon Mission Luna 25: चंद्रयान 3 पाठोपाठ रशियाने चंद्रावर पाठवले लुना-25

Russia's Moon Mission Luna 25: चंद्राच्या पृष्ठभागाचे 6 इंच खोलपर्यंत नमूने गोळा करणार असून चंद्रावरील मातीची संरचना आणि धुळीचे देखील रशियाचे हे यान परिक्षण करणार आहे.

दैनिक गोमन्तक

Russia's Moon Mission Luna 25: आज सकाळीच रशियाच्या रोस्कोस्मोस या अंतराळ एजन्सीने लुना-25 या यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. गेल्या 47 वर्षात रशियाचे चंद्रावरील हे पहिलेच यान आहे.

महत्वाचे म्हणजे भारताचे चंद्रयान 3 चंद्राच्या ज्या दक्षिण भागात उतरणार आहे त्याच भागात हे रशियाचे लुना- 25 हे यान उतरणार असल्यानं दोन्ही यानांची तुलना केली जात आहे.चला तर जाणून घेऊयात चंद्रयान 3 आणि लुना-25 यामध्ये काय फरक आहे.

भारताचे चांद्रयान 3 हे दोन आठवडे चंद्रावर प्रयोग करण्यासाठी डिझाईन केलं आहे. तर, लूना-25 हे वर्षभर चंद्रावर असणार आहे. चंद्रावरील पाण्याचं अस्तित्व तपासण्यासाठी लुना चंद्राच्या पृष्ठभागाचे 6 इंच खोलपर्यंत नमूने गोळा करणार असून चंद्रावरील मातीची संरचना आणि धुळीचे देखील रशियाचे हे यान परिक्षण करणार आहे.

तर भारताचे ध्येय चंद्रयान 3 च्या रोव्हरचे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करणे हे असून वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी चंद्राची भूमी योग्य असेल की नाही याचा अभ्यास करणार आहे.

रशियाचे हे लूना-25 यान 21 किंवा 22 ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यता असून भारताचे चंद्रयान 3 हे 23 ऑगस्ट ला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. असे असले तरीही चंद्रावर रोव्हर उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. त्यामुळे चंद्रयान 2 च्या अपयशानंतर आता वैज्ञानिकांनी अथक प्रयत्न केला असून चंद्रावर रोव्हरचे सॉफ्ट लँडिंग होण्याची अपेक्षा केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT