Jon Goodwin, Keisha Schahaff And Anastatia Mayers Virgin Galactic's First Space Trip:
स्पेसफ्लाइट कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकने नुकतेच आपल्या पहिल्या काही पर्यटकांसह अंतराळाच्या सीमेवर उड्डाण केले.
या पर्यटकांमध्ये माजी ब्रिटिश ऑलिम्पियनचाही समावेश आहे. ज्याने 18 वर्षांपूर्वी अंतराळा प्रवासाचे तिकीट खरेदी केले होते.
अंतराळ विमान थोड्या उड्डाणानंतर न्यू मेक्सिकोच्या वाळवंटातील स्पेसपोर्ट अमेरिका येथे धावपट्टीवर उतरले.
या पहिल्या खासगी पर्यटक अंतराळ उड्डाणाला वर्षानुवर्षे विलंब झाला. आता यामध्ये मिळालेल्या यशामुळे रिचर्ड ब्रॅन्सनची व्हर्जिन गॅलेक्टिक आता जेफ बेझोसच्या ब्लू ओरिजिन आणि एलोन मस्कच्या (Elon Musk) स्पेसएक्स (Spacex) बरोबर अवकाश पर्यटन व्यवसायात स्पर्धा करू शकते.
प्रवासी जॉन गुडविन (Jon Goodwin) यांनी त्यांच्या उड्डाणानंतर सांगितले की, "मी माझ्या आयुष्यात केलेली ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट होती."
2005 मध्ये या अंतराळ प्रवासाचे तिकीट खरेदी करणाऱ्यांपैकी जॉन गुडविन पहिले होते. त्यांनी सांगितले की त्यांना विश्वास होता की एक दिवस अंतराळ प्रावासाची संधी मिळेल. 80 वर्षांच्या जॉन गुडविन यांनी 1972 च्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.
गुडविनने खरेदी केले तेव्हा तिकिटाची किंमत सुमारे दिड कोटी रुपये होती. आता ती सुमारे 4 कोटी इतकी झाली आहे.
या पर्यटक अंतराळयानात अँटिग्वा येथील आरोग्य प्रशिक्षक केशा शाफ (Keisha Schahaff) आणि तिची मुलगी अनास्तासिया मेयर्स (Anastatia Mayers) या माय-लेकीही सहभागी झाल्या होत्या.
"अंतराळ प्रवासाचे माझे बालपणीचे स्वप्न साकार झाले आहे, असे शॅफ म्हणाल्या. माझ्याकडे शब्द नाहीत."
व्हर्जिन गॅलेक्टिकची (Virgin Galactic) 2018 पासूनची अंतराळातील सातवी फेरी होती, परंतु पर्यटकांना घेऊन जाणारी पहिली होती.
इटालियन लष्करी आणि सरकारी संशोधकांनी जूनमध्ये पहिले पर्यटक उड्डाण केले. कंपनीच्या म्हणण्यानुसार सध्या व्हर्जिन गॅलेक्टिकच्या प्रतीक्षा यादीत सुमारे 800 लोक आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.