Russia Vs Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनमध्ये रशियाचा कहर, सैन्य कीवकडे रवाना; महासत्ता पुतिनला शरण!

युक्रेन संघर्षात आतापर्यंत 1,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. अमेरिकेचे प्रचंड सैन्य आणि शस्त्रास्त्रे नाटो देशांना पाठिंबा देत असूनही, महासत्ता पुतिनला शरण गेली. सध्या अशीच स्तिथी आहे.

दैनिक गोमन्तक

रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र केले आहेत. दरम्यान, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, युक्रेन संघर्षात आतापर्यंत 1,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. त्याच वेळी, रशियन सैन्य सतत पुढे जात आहे आणि युक्रेन सैन्य त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाला रोखण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने एक पूल उडवला. रशिया एका बाजूने हल्ला करत नाही तर त्यांनी प्रत्येक लक्ष्य निश्चित केले आहे. रशियन (Russia) सैन्याची हालचाल थांबवण्यासाठी युक्रेनने खार्किव प्रदेशातील ओस्कोल नदीवरील पूल उडवून दिल्याचे रशियन सैनिकांनी स्वतःहून नोंदवले आहे. (Russia Vs Ukraine War Update)

याआधी सकाळी युक्रेनचे (Ukraine) अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले होते की, रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानीत दाखल झाले आहे. त्याचवेळी, सुमीच्या गव्हर्नरने म्हटले आहे की, रशियन सैन्याने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. युक्रेनच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, राजधानी कीववर पहिला क्षेपणास्त्र हल्ला क्रूझ किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने करण्यात आला. दोन मोठे धमाके ऐकू आले आहेत. तर युक्रेनने दोन रशियन क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे.

अवघ्या 40 मिनिटांत कीव वर डागली 36 क्षेपणास्त्रे

रशियन सैन्याने सकाळी अवघ्या 40 मिनिटांत कीववर 36 क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा अमेरिकन सिनेटरने केला आहे. युक्रेन पूर्णपणे एकाकी झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाविरुद्ध युद्ध करणार नसल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी त्यांच्या भाषणात दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यावर जग आश्चर्य व्यक्त करत आहे. प्रथम म्हणजे, अमेरिका रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करणार नाही, असे ते म्हणाले. तर दुसरे म्हणजे, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात अमेरिका हा त्यांचे सैन्य पाठवणार नाही.

एकिकडे युक्रेनचे लोक जगाकडे मदत मागत आहेत. तेथे बारूदच्या आगीत निष्पाप लोक होरपळून निघत आहेत. 'रोम जळत होता आणि नीरो बनशी खेळत होता' अशी जुनी म्हण आहे. आज युक्रेन जळत आहे आणि अमेरिका (America) फक्त निर्बंधांचा सूर लावत आहे. अमेरिकेचे प्रचंड सैन्य आणि शस्त्रास्त्रे नाटो देशांना पाठिंबा देत असूनही, महासत्ता पुतिनला शरण गेली. सध्या अशीच स्तिथी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

The Hundred League: 13 चेंडूत 50 धावा...! लियम लिविंगस्टन-जेकब बेथेल जोडीने मोडला 136 वर्ष जुना रेकॉर्ड; ‘द हंड्रेड’मध्ये केला मोठा धमाका

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Online Scam: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT