अभिमानास्पद! भारताला मिळाला पहिला बोल्ट्झमन पुरस्कार

सांख्यिकीय भौतिकशास्रज्ञ डॉ. दीपक धर यांना घोषित; वैज्ञानिक समुदायात आनंदाचे वातावरण
Deepak Dhar First Indian Conferred With Boltzmann Medal
Deepak Dhar First Indian Conferred With Boltzmann MedalDainik Gomantak
Published on
Updated on

विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा जागतिक स्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार हा सांख्यिकीय भौतिकशास्रज्ञ डॉ. दीपक धर यांना घोषित झाला. त्याच्या रूपाने भारताला पहिल्यांदाच हा पुरस्कार (Awards) प्राप्त झाला आहे. सांख्यिकीय भौतिकशास्रज्ञ क्षेत्रातला हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. नोबेल पुरस्कारा इतकाच प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार दर तीन वर्षांनी घोषित करण्यात येतो.

Deepak Dhar First Indian Conferred With Boltzmann Medal
Delhi: सोमवारपासून नाईट कर्फ्यूसह कोरोना निर्बंध येणार संपुष्टात

इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर ॲण्ड ॲप्लाइड फिजिक्स या संस्थेच्या स्टॅटीस्टीकल कमिशनद्वारे हा पुरस्कार घोषित करण्यात येतो. या पुरस्कारांची घोषणा ही 1975 पासून करण्यात येत आहे. सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील भरीव आणि महत्त्वपूर्ण संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 2022 या वर्षासाठीचा हा पुरस्कार डॉ. धर आणि अमेरिकेतील प्रिंन्सटन विद्यापीठाच्या डॉ.जॉन हॉपफिल्ड यांना घोषित झाला आहे.

भौमितिक रचनांची कार्यप्रणाली (फ्रॅक्ट्रल्स), स्व-संघटित क्लिष्ट रचना, प्राण्यांशी निगडित संख्याशास्रीय समस्या, चुंबक आणि काचेमधील बदलत्या रचनांचा सख्याशास्रीय अभ्यास हे डॉ. धर यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्ये आहे. प्रसिद्ध भौतिकशास्रज्ञ डॉ. रिचर्ड फाइन्मन यांचे विद्यार्थी असलेले डॉ. धर सध्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (आयसर) येथे भौतिकशास्त्र विभागात प्रतिष्ठीत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याना मिळालेला हा पुरस्कार देशासाठी अभिमानाची गोष्ट असल्याची भावना वैज्ञानिक समुदायातून व्यक्त केली जात आहे.

जीवन परिचय:

डॉ. दीपक धर (जन्म : 30 ऑक्टोबर 1991)

- उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे जन्म

- अलाहबाद विद्यापीठ येथून विज्ञान विषयात पदवी प्राप्त

- आयआयटी कानपूर मधून 1972 मध्ये पदव्युत्तर पदवी

- अमेरिका येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पीएच.डी.

- 1978 मध्ये भारतात परतल्यावर टाटा मूलभूत विज्ञान संस्था येथे संशोधनाला सुरवात

- पॅरिस विद्यापीठ येथे (1984-85) व्हिजिटिंग प्राध्यापक

मिळालेले पुरस्कार आणि सन्मान:

- फेलो : द वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी

- 1991 मध्ये देशातील सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कार शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित

- आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकशास्त्र

केंद्राने त्यांना 1993 च्या जे. रॉबर्ट श्रिफर पुरस्कारासाठी निवड केली.

- आयएनएसएने 2001 मध्ये धर यांना पुन्हा सत्येंद्रनाथ बोस मेडल देऊन सन्मानित केले

- 2002 मध्ये द वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे टीडब्ल्युएएस पारितोषिक मिळाले.

प्रथमच मला काय बोलावे हे सुचत नाही. निश्चितच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जसे न्यूटन म्हटले आहे की, वैज्ञानिक हे महासागराच्या किनाऱ्यावरील शिंपले गोळा करणारे लहान मुलं असतात. अचानक एखाद्याला हाताला अनमोल शिंपला लाभतो. तसेच जगातील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक गणितावर काम करण्याचे भाग्य एखाद्या वैज्ञानिकाल्ा मिळते. त्यापैकी मी एक आहे.

- प्रा. डॉ. दीपक धर, बोल्ट्झमन मेडल प्राप्त वैज्ञानिक, आयसर, पुणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com