russia ukraine war Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: 24 तासांत रशियाचा युक्रेनवर दुसरा हल्ला, 10 वर्षाच्या चिमुरड्याचा...

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Manish Jadhav

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. 550 हून अधिक दिवस चाललेल्या या युद्धात हजारो सैनिक आणि लोकांनी आपले जीव गमावले आहेत.

शुक्रवारी पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खार्किवच्या पूर्वेकडील भागातील निवासी इमारतींवर रशियाने हल्ला केला.

या हल्ल्यात एका 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर दोन डझन जण जखमी झाले. खार्किव, युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर, रशियाच्या सीमेला लागून असलेल्या प्रदेशात आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियन सैन्याने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून येथे दररोज गोळीबार होत आहे.

10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला

अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, रशियाकडून (Russia) नागरिकांवर आणखी एक हल्ला. ढिगाऱ्याखाली 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला. प्रादेशिक गव्हर्नर ओलेग सिनेगुबोव्ह यांनी सांगितले की, या हल्ल्यात 11 महिन्यांच्या बाळासह 23 जण जखमी झाले आहेत. शोध मोहीम अजूनही सुरु आहे.

24 तासांपेक्षा कमी कालावधीत दुसरा हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन क्रूझ क्षेपणास्त्रांनी शहरावर दोनदा हल्ला केला. यामध्ये एक क्षेपणास्त्र रस्त्यावर पडले, त्यामुळे घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तर दुसरे क्षेपणास्त्र तीन मजली निवासी इमारतीवर पडल्याने आग लागली.

युक्रेनच्या (Ukraine) खार्किव शहरावर रशियाच्या सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी 50 हून अधिक लोक मारले गेल्यानंतर 24 तासांपेक्षा कमी कालावधीत हा दुसरा हल्ला होता. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका 10 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.

25 ड्रोन पाडल्याचा दावा

तथापि, युक्रेनचा दावा आहे की, त्याने 25 रशियन ड्रोन एका रात्रीत पाडले. युक्रेनच्या हवाई दलाने संपूर्ण प्रदेशात रात्रभर प्रक्षेपित केलेल्या 33 पैकी 25 ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.

टेलीग्राम या प्लॅटफॉर्मवर हवाई दलाने सांगितले की, त्यांनी ओडेसा, खार्किव, मायकोलायव आणि डनिप्रोसह सहा प्रदेशांमध्ये 136 ड्रोन पाडले.

इतर 8 ड्रोनने कोणत्या भागात हल्ला केला हे मात्र स्पष्ट झालेले नाही. युक्रेनियन संरक्षण दलांनी टेलीग्रामवर सांगितले - दक्षिण मायकोलायव्ह प्रदेशात आठ इतर ड्रोन नष्ट केले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electric Buses: 'पीएम ई-बस सेवा' योजनेतून गोव्याला मिळणार 200 आधुनिक बसेस, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फायदा

Kala Academy Award Controversy: कला अकादमी सॉफ्ट टार्गेट! युगांक नायक यांच्या आक्षेपामुळे पुरस्कारावरुन वादंग; नाट्यस्पर्धेच्या नियमांमध्ये बदलाची गरज

Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT