Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर पुन्हा डागली क्षेपणास्त्रे, हल्ल्यात 48 जणांचा मृत्यू

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarDainik Gomantak

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे.

युक्रेनच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.

युक्रेनच्या (Ukraine) अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाने देशाच्या ईशान्य भागातील एका गावावर हल्ला केला. या हल्ल्यात एकूण 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.

प्रेसिडेंशियल चीफ ऑफ स्टाफ आंद्रे येर्माक आणि खार्किवचे गव्हर्नर ओलेह सिनिहुबोव्ह यांनी सांगितले की, रशियन सैन्याने खार्किव प्रदेशातील ह्रोझा गावात दुपारी 1 वाजता एका दुकान आणि कॅफेवर हल्ला केला.

दरम्यान, ठार झालेल्यांमध्ये सहा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. याआधी, गुरुवारी पहाटे आणखी एका मोठ्या हल्ल्यात रशियाने (Russia) युक्रेनच्या अनेक भागांना ड्रोनने लक्ष्य केले होते.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की सुमारे 50 युरोपीय नेत्यांच्या शिखर परिषदेला पाश्चात्य मित्र राष्ट्रांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी स्पेनच्या दौऱ्यावर असताना हा हल्ला झाला आहे.

युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, देशाच्या हवाई संरक्षणाने इराणी बनावटीच्या 29 पैकी 24 ड्रोन पाडले. हे ड्रोन रशियाने दक्षिण ओडेसा, मायकोलायव आणि किरोवोहराद भागात डागले. दरम्यान, युक्रेनच्या अधिकार्‍यांनी अद्याप जीवित किंवा मालमत्तेच्या हानीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

Russia Ukraine War
Russia Ukraine War: युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्याने रशिया हादरला, कमांडरसह 34 सैनिक ठार

झेलेन्स्की स्पेनमध्ये पोहोचताच रशियाने मोठा हल्ला केला

युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी (EPC) च्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी झेलेन्स्की दक्षिण स्पेनमधील ग्रॅनाडा येथे आले असताना हा हल्ला झाला. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याची स्थापना झाली.

आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्यापूर्वी हवाई संरक्षण यंत्रणा मजबूत करायची आहे, असे झेलेन्स्की म्हणाले. गेल्या हिवाळ्यात, रशियाने युक्रेनची ऊर्जा प्रणाली आणि इतर अनेक पायाभूत सुविधांना क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसह लक्ष्य केले, ज्यामुळे देशभरात वीज खंडित झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com