Russian Air Strike Dainik Gomantak
ग्लोबल

Russian Air Strike: रशियाचा कीववर सर्वात मोठा हवाई हल्ला! 500 हून अधिक ड्रोन अन् 40 क्षेपणास्त्रे डागली; पोलंडने हवाई हद्द केली बंद VIDEO

Russia Kyiv Air Attack Video: रशियाने युक्रेनची राजधानी कीव येथे अत्यंत मोठा आणि विनाशकारी हवाई हल्ला केला आहे.

Manish Jadhav

Russia Kyiv Air Attack Video: रशियाने युक्रेनची राजधानी कीव येथे अत्यंत मोठा आणि विनाशकारी हवाई हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने रात्रीतून 500 हून अधिक ड्रोन आणि 40 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांचा (Missiles) मारा कीववर केला. फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरु झाल्यापासून कीव शहरावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. या भीषण हल्ल्यात आतापर्यंत किमान 4 जणांचा मृत्यू झाला असून, 10 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

स्काय न्यूजच्या माहितीनुसार, हा हल्ला इतका भयानक होता की, संपूर्ण रात्रभर कीवच्या आकाशात ड्रोन घिरट्या घालत होते आणि क्षेपणास्त्रे व रॉकेटच्या स्फोटांचे आवाज घुमत होते. स्वतंत्र निरीक्षण गटांच्या म्हणण्यानुसार, शनिवारची रात्र आणि रविवारची सकाळ (स्थानिक वेळेनुसार सकाळी 6च्या सुमारास) रशियाने कीव शहरावर केलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक होती.

कीव येथील लष्करी प्रशासनाचे प्रमुख तिमूर तकचेन्को यांनी टेलीग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 12 वर्षीय मुलीचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे, परंतु याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवाई हद्द बंद

रशियाने (Russia) युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेऊन शेजारील देश पोलंडने तातडीने कठोर पाऊल उचलले आहे. पोलंडने आपल्या दक्षिण-पूर्वेकडील दोन शहरांजवळची हवाई हद्द बंद केली. या भागामध्ये लुब्लिन (Lublin) आणि र्शेसोव (Rzeszów) या शहरांचा समावेश आहे.

इतकेच नाही, तर रशियाच्या या मोठ्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पोलंडने आपल्या वायुसेनेचे जेट विमान (Fighter Jets) आकाशात तैनात केले आहेत. रशियन हल्ला पोलंडच्या सीमेच्या जवळ असल्याने आणि तो थेट पोलंडच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलंडने हा आत्मसंरक्षणात्मक आणि प्रतिबंधात्मक निर्णय घेतला.

झेलेन्स्की यांची जगाकडे मागणी

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या या हल्ल्याची माहिती देताना, रात्रीतून सुमारे 500 ड्रोन आणि 40 हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे सांगितले.

झेलेन्स्की यांनी टेलीग्रामवर एक संदेश जारी करत म्हटले की, 'मॉस्कोने लढणे आणि मारणे सुरुच ठेवले आहे.' त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला रशियावर आणखी कडक निर्बंध लादण्याचे आणि युक्रेनला मदतीचा पुरवठा वाढवण्याचे आवाहन केले.

कीव व्यतिरिक्त युक्रेनच्या (Ukraine) इतर भागांमध्येही रशियाने हल्ले केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील शहर झापोरीझ्झिया (Zaporizhzhia) येथे झालेल्या हल्ल्यात किमान 16 लोक जखमी झाले असून, त्यात तीन लहान मुलांचाही समावेश आहे. या सततच्या आणि मोठ्या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: 'पार्टटाईम नोकरी'च्या आमिषाने 3.69 लाखांचा गंडा; कोरगावातील युवतीची पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार

Goa Market Complex: डिचोलीतील बाजार संकुलाची होणार दुरुस्ती; आमदारांकडून संकुलाची पाहणी

Goa Heavy Rain: सत्तरीत वादळी वाऱ्यामुळे 27 ठिकाणी झाडे कोसळली; पडझड सुरूच, अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ

Goa Fraud Case: फरार बलरामच्या शोधासाठी विमानतळांवर 'अलर्ट'; ED अधिकाऱ्याचे सोंग घेऊन लूट, 'इंटर ऑपरेबल सिस्टिम'द्वारे शोध सुरू

Goa Drug Case: पणजी अमलीपदार्थ प्रकरण; संशयिताचा 'डिफॉल्ट' जामीन अर्ज फेटाळला, रासायनिक अहवालावरून कोर्टात खल

SCROLL FOR NEXT