Hypersonic Missiles Dainik Gomantak
ग्लोबल

रशियाने युक्रेनवर पहिल्यांदाच डागले किन्झेल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र

युक्रेनसोबत सुरु असलेल्या युद्धात रशियाने शुक्रवारी पहिल्यांदाच युक्रेनवर अत्याधुनिक किन्झेल हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी (Missiles) हल्ला केला आहे.

दैनिक गोमन्तक

युक्रेनसोबत सुरु असलेल्या युद्धात रशियाने शुक्रवारी पहिल्यांदाच युक्रेनवर अत्याधुनिक किन्झेल हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी (Missiles) हल्ला केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, 'रशियन लष्कराने या क्षेपणास्त्राचा वापर पश्चिम युक्रेनमधील (Ukraine) शस्त्रसाठा नष्ट करण्यासाठी केला आहे.' (Russia launches sophisticated kinzhal hypersonic missile at Ukraine)

दरम्यान, रशियाने (Russia) यापूर्वी कधीही युक्रेनसोबतच्या युद्धात हायपरसॉनिक शस्त्रे वापरल्याचे कबूल केलेले नाही. रशियन न्यूज एजन्सी आरआयए नोवोस्तीने सांगितले की, 'पश्चिम युक्रेनमधील संघर्षादरम्यान किन्झेल हायपरसोनिक शस्त्रांचा हा पहिला वापर होता.' रशियाने शुक्रवारी युक्रेनमध्ये आपल्या नवीन किन्झेल हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर देशाच्या पश्चिमेकडील शस्त्र साठा नष्ट करण्यासाठी केला असल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

यापूर्वी रशियाने युद्धात हायपरसॉनिक शस्रे वापरत असल्याचे मान्य केले नव्हते. RIA नोवोस्ती या वृत्तसंस्थेने सांगितले की, पश्चिम युक्रेनमधील संघर्षादरम्यान किन्झेल हायपरसोनिक शस्त्रांचा हा पहिला वापर होता. "हायपरसॉनिक एरोबॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह किन्झेल एव्हिएशन क्षेपणास्त्र प्रणालीने इव्हानो-फ्रँकिव्हस्क प्रदेशातील डेलियाटिन गावातील दारुगोळा असलेले एक मोठे भूमिगत गोदाम नष्ट केले," अशी माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने शनिवारी दिली.

दुसरीकडे मात्र रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने यावर भाष्य करण्यास नकार दिला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी किन्झेल (Dagger) क्षेपणास्त्राचा उल्लेख "एक आदर्श शस्त्र" असे केला आहे. जे आवाजाच्या 10 पट वेगाने उडते. किन्झेल क्षेपणास्त्र हे 2018 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रांपैकी एक आहे. कार्पेथियन पर्वताच्या पायथ्याशी असलेले डेलियाटिन हे गाव इव्हानो-फ्रँकिव्हस्क शहराच्या बाहेर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"फायनलमध्ये भारताशी सामना झाला, तर काय करणार?" स्वतःच्याच बोर्डाविरोधात उभा ठाकला पाकिस्तानी खेळाडू, 'बॉयकॉट'वरून 'PCB'ला खडे बोल

Shukra Rahu Yuti 2026: फेब्रुवारीत नशिबाची साथ! शुक्र-राहूच्या युतीने 'या' 3 राशी होणार मालामाल, अडकलेली कामं पूर्ण होणार

BITS Pilani: सहावा बळी! "आता आश्वासनं नको, न्यायालयीन चौकशी हवी", बिट्स पिलानीतील मृत्यूच्या सत्रावरून पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल

Goa Accident: वळणावर दुचाकी घसरली अन् दोन्ही पाय तुटले, झुआरी पुलावर भयंकर अपघात! 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IND VS PAK: मैदानावर हाय-व्होल्टेज ड्रामा! वैभव सूर्यवंशी पाकिस्तानच्या फलंदाजावर भडकला; उपकर्णधाराला करावा लागला हस्तक्षेप VIDEO

SCROLL FOR NEXT