Qatar Gas Plant Explosion Dainik Gomantak
ग्लोबल

Qatar Gas Plant Explosion: काळाचा भीषण घाला! कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्लांटमध्ये स्फोट; 54 जण रक्ताच्या थारोळ्यात, 18 अजूनही बेपत्ता

Qatar Ras Laffan Gas Plant Explosion: कतार एनर्जीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, रविवारी संध्याकाळी ऑपरेशन्स सुरु करत असताना झालेल्या या घटनेमुळे मोठी आग लागली.

Manish Jadhav

Qatar Ras Laffan Gas Plant Explosion: कतारमधील लिक्विफाइड नॅशनल गॅस प्रक्रिया करणाऱ्या रास लफ्फान या अत्यंत महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रातील बारझान स्थानिक गॅस पुरवठा प्रकल्पात रविवारी (21 जून) रात्री उशिरा एक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत 54 कामगार गंभीर जखमी झाले असून, 18 जण अजूनही बेपत्ता आहेत. हा स्फोट इतका भयानक होता की, त्यामुळे प्रकल्पाच्या एका मोठ्या भागाला आगीने वेढले.

युद्धादरम्यान इराणने या प्रकल्पावर केलेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर कामगार येथील कामकाज पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करत असतानाच हा अपघात घडला. कतार एनर्जीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, रविवारी संध्याकाळी ऑपरेशन्स सुरु करत असताना झालेल्या या घटनेमुळे मोठी आग लागली, ज्यावर आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी अथक प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवले.

स्फोटानंतर सुरुवातीला प्रशासनाने केवळ काही लोक जखमी झाल्याचे सांगितले होते, परंतु काही तासांनंतर कतारच्या गृह मंत्रालयाने धक्कादायक आकडेवारी जाहीर करत 54 जण जखमी आणि 18 जण बेपत्ता असल्याची पुष्टी केली. गृह मंत्रालयाच्या मते, हा स्फोट एका 'तांत्रिक अपघातामुळे' झाला असून सार्वजनिक सुरक्षेला कोणताही धोका नाही.

बारझान गॅस प्रकल्पाची क्षमता दररोज सुमारे 1.4 अब्ज मानक घनफूट गॅस विक्रीची आहे. कतार प्रामुख्याने याचा वापर स्थानिक वीज निर्मितीसाठी आणि अरबी द्वीपकल्पातील वाळवंटी भागातील पाण्याचे निःक्षारीकरण (खारे पाणी गोड करणे) करणाऱ्या प्रकल्पांना उर्जा देण्यासाठी करतो. याशिवाय, देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी इथेन, कंडेन्सेट, एलपीजी आणि सल्फरचे उत्पादन करण्याची क्षमताही या प्रकल्पात आहे.

हा प्रकल्प रास लफ्फान इंडस्ट्रियल सिटीमध्ये स्थित आहे, जे कतार एनर्जीचे एलएनजी उत्पादन आणि निर्यातीचे मुख्य केंद्र आहे. या संपूर्ण प्रकल्पाची मालकी जवळपास पूर्णपणे कतारकडे असून, एक छोटा हिस्सा एक्सॉनमोबिल कंपनीकडे आहे. अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे आधीच पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि किमतींमधील चढ-उतारामुळे जागतिक ऊर्जा बाजार त्रस्त आहे; अशा स्थितीत रास लफ्फानमधील या स्फोटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणखी मोठे संकट निर्माण होऊ शकते.

यापूर्वी, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्यामुळे कतारला आपल्या ग्राहकांपर्यंत गॅसची जहाजे पाठवणे अशक्य झाले होते, ज्यामुळे कतारने आपले उत्पादन तात्पुरते बंद केले होते. मात्र, युद्ध संपवण्याच्या वाटाघाटी सुरु असताना इराणने या सामुद्रधुनीवरील आपली पकड सैल केल्यावर कतारने (Qatar) आपले निर्यात टर्मिनल्स पुन्हा सुरु करण्याचे काम हाती घेतले. दुर्दैवाने, हे काम सुरु असतानाच हा भीषण स्फोट झाला. याआधी मार्च महिन्यातही इराणच्या एका क्षेपणास्त्राने रास लफ्फानला लक्ष्य केले होते, ज्यामुळे तिथे मोठी आग लागून मोठे नुकसान झाले होते.

भारताच्या (India) दृष्टीने ही बातमी अत्यंत चिंतेची आहे, कारण भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा एलएनजी आयातदार देश असून तो आपल्या एकूण गॅस आयातीपैकी सुमारे 41टक्के गॅस कतारकडून आयात करतो. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात भारताने 27 दशलक्ष मेट्रिक टनपेक्षा जास्त एलएनजी आयात केला होता, ज्यामध्ये एकट्या कतारचा वाटा 11.2 दशलक्ष टन इतका मोठा होता. त्यामुळे या स्फोटाचा थेट परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोव्यात काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'गोवा रक्षण यात्रा'द्वारे जनसंपर्क अभियानावर मोठा भर

Goa recruitment: गोव्यात सरकारी कंत्राटी नोकरीची मोठी संधी! 'समग्र शिक्षा'अंतर्गत 37 पदांसाठी पर्वरी येथे वॉक-इन मुलाखत

Reis Magos: रेईश-मागूश ग्रामसभेत राडा! महिला सरपंचांसह शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल

Mandovi River: मांडवी नदीचे पात्र प्रदूषितच! प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अखेर उच्च न्यायालयात सादर

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

SCROLL FOR NEXT