Iran Shopping Center Fire: इराणमध्ये शॉपिंग सेंटरला भीषण आग! 8 जणांचा होरपळून मृत्यू, 36 जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

Iran Shopping Center Fire Video: इराणची राजधानी तेहरानच्या उपनगरातील एका शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Iran Shopping Center Fire Video
Iran Shopping Center FireDainik Gomantak
Published on
Updated on

Iran Shopping Center Fire Video: इराणची राजधानी तेहरानच्या उपनगरातील एका शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. या भीषण अग्निकांडात 8 जणांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. इराणच्या सरकारी माध्यमाने बुधवारी (5 मे) या घटनेची अधिकृत माहिती दिली असून सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मंगळवारी ही आग तेहरान प्रांतातील अंडीशे शहरातील 'अरघवान शॉपिंग सेंटर'मध्ये लागली.

दरम्यान, या आगीचे (Fire) नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. इराणचे राज्य दूरदर्शन 'आयआरआयबी'ने (IRIB) दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दुर्घटनेनंतर समोर आलेल्या फुटेजमध्ये या बहुमजली इमारतीतून काळ्या धुराचे लोट आकाशात उठताना दिसत आहेत, तर दुसरीकडे अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या तीन आठवड्यांपासून अमेरिकेसोबत एक नाजूक संघर्षविराम लागू आहे. अशा संवेदनशील काळात ही आगीची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली; मात्र या आगीचा सध्या सुरु असलेल्या युद्धाशी किंवा संघर्षाशी कोणताही संबंध असल्याचे संकेत मिळालेले नाहीत. प्रशासन आता या घटनेमागील तांत्रिक कारणांचा किंवा मानवी त्रुटींचा शोध घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ambedkar Nagar Road Accident
US Iran Ceasefire Celebration Tehran
US Airstrike on IRGC Headquarters Tehran
Ghogal liquor shop fire
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com