US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Irsrael Rejects US Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच झालेल्या शांतता कराराला इस्रायलने मान्यता देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
Benjamin Netanyahu on US Iran deal
Benjamin Netanyahu on US Iran dealDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Irsrael Rejects US Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच झालेल्या शांतता कराराला इस्रायलने मान्यता देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. या धक्कादायक घडामोडीची माहिती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करुन दिली. नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना ठणकावून सांगितले की, इस्रायलचे सैन्य लेबनॉनमधून कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही आणि इस्रायल या कराराच्या अटी मानण्यास अजिबात बांधील नाही.

या शांतता कराराच्या वाटाघाटींमधून इस्रायलला पूर्णपणे बाजूला सारण्यात आल्याने नेतन्याहू यांनी हे अत्यंत आक्रमक पाऊल उचलले. वास्तविक, अमेरिकेने या कराराला अंतिम रुप देताना तेल अवीवच्या (इस्रायल) एकाही अटीचा त्यात समावेश केला नाही, जो पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासाठी खूप मोठा राजकीय आणि धोरणात्मक धक्का मानला जात आहे.

Benjamin Netanyahu on US Iran deal
US Iran Peace Deal: "द डील इज कम्प्लीट!" अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक शांतता करार; 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होणार अधिकृत स्वाक्षरी

हा शांतता करार बेंजामिन नेतन्याहू यांच्या परराष्ट्र धोरणाचा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे, यामागे काही प्रमुख कारणे आहेत. जेव्हा इराणसोबतच्या करारावर पडद्यामागे चर्चा सुरु होती, तेव्हा अमेरिकेने इस्रायलला या प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर ठेवले. परिणामी, इराणच्या छुप्या प्रॉक्सी नष्ट करणे आणि त्यांच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीवर बंदी घालणे, या इस्रायलच्या मुख्य अटी करारातून बाद झाल्या. याशिवाय, करारातील अटींनुसार इस्रायलला लेबनॉनवरील हल्ले थांबवावे लागणार आहेत आणि आपले सैनिक मागे घ्यावे लागणार आहे.

Benjamin Netanyahu on US Iran deal
US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

मात्र, दुसरीकडे इस्रायलवर हिजबुल्लाहकडून भविष्यात हल्ले होणार नाहीत, याची कोणतीही ठोस हमी इस्रायलला मिळालेली नाही. युद्धाच्या सुरुवातीला नेतन्याहू यांनी आपल्या सर्व शत्रूंना चिरडण्याची आणि विरोधी देशांमधील सत्तापालट करण्याची भाषा केली होती, परंतु इराणमध्ये अजूनही इस्लामिक प्रजासत्ताक सरकार कायम आहे आणि लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा प्रभाव कमी झालेला नाही. या युद्धात इस्रायलने 12 अब्ज डॉलर्सचा अवाढव्य खर्च केला, परंतु अखेरच्या टप्प्यात अमेरिकेने त्यांना एकटे सोडले.

Benjamin Netanyahu on US Iran deal
US Iran War: ''दादागिरी खपवून घेणार नाही, सर्वनाश करु'', ट्रम्प यांच्या धमकीवर मोजतबा खामेनेईंचा पलटवार; आखाती देशांत युद्धाचं सावट कायम

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर आता मध्य पूर्व आशियात पुढे काय होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला. इस्रायलने लेबनॉनमधून मागे हटण्यास नकार दिल्यामुळे येत्या काही दिवसांत ते लेबनॉनवर पुन्हा मोठे हल्ले करु शकतात. इस्रायलच्या अशा पावलांमुळे चिडून इराण हा शांतता करार मोडीत काढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक दिवसापूर्वीच म्हटले होते की, माझ्यामुळेच इस्रायलचे अस्तित्व टिकून आहे. या तणावाच्या दरम्यान, तेल अवीव विमानतळावर अमेरिकेची (America) काही इंधन भरणारी विमाने उभी आहेत, जी तातडीने तिथून हटवण्यात यावीत अशी आक्रमक मागणी इस्रायलच्या परिवहन मंत्र्यांनी केली आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

US Iran talks three hour meeting
Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
US Iran War End Donald Trump Peace Deal Statement
Benjamin Netanyahu and Donald Trump
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com