US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

Itamar Ben Gvir Statement On Trump Deal: मंत्री बेन ग्वेर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या करारावर अत्यंत कडक शब्दांत आक्षेप घेतला.
Itamar Ben Gvir Statement On Trump Deal
Itamar Ben GvirDainik Gomantak
Published on
Updated on

Itamar Ben Gvir Statement On Trump Deal: दीर्घकाळापासून सुरु असलेल्या संघर्षानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अखेर थांबले असून दोन्ही देशांनी ऐतिहासिक कराराची अधिकृत घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे इराणसोबत करार झाल्याची पुष्टी केली, तर दुसरीकडे इराणनेही या वृत्ताला दुजोरा दिला. अनेक महिन्यांच्या अत्यंत कठीण आणि प्रदीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीच्या सामंजस्य कराराला (MoU) अंतिम रुप दिले.

या मोठ्या घोषणेमुळे मध्य पूर्व आशियात शांततेची एक नवी आशा निर्माण झाली. मात्र, हा करार होताच इस्रायलचे उजवे विचारसरणीचे नेते आणि नेतन्याहू सरकारमधील शक्तिशाली मंत्री बेन ग्वेर यांनी अत्यंत प्रक्षोभक आणि आक्रमक विधान केले, ज्यामुळे या क्षेत्रातील इतर देशांची चिंता पुन्हा एकदा वाढली.

Itamar Ben Gvir Statement On Trump Deal
US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

मंत्री बेन ग्वेर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या करारावर अत्यंत कडक शब्दांत आक्षेप घेतला. ते म्हणाले की, ट्रम्प यांनी केलेला हा करार इस्रायलवर अजिबात लागू होत नाही. इस्रायल हा अमेरिकेच्या अधीन असलेला कोणताही गुलाम देश नसून, तो एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे. आमचे पहिले कर्तव्य इस्रायलचे नागरिक, आयडीएफचे सैनिक आणि यहुदी लोकांच्या सुरक्षेसाठी आहे.

Itamar Ben Gvir Statement On Trump Deal
US Iran Peace Deal: "द डील इज कम्प्लीट!" अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक शांतता करार; 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होणार अधिकृत स्वाक्षरी

हजारो वर्षांच्या वनवासात ज्या यहुद्यांचा छळ झाला आणि जे मारले गेले, त्या सर्वांच्या प्रति आमची एक ऐतिहासिक जबाबदारी आहे की आम्ही आमच्या मातृभूमीत यहुद्यांचे रक्षण केले पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय दबावापुढे गुडघे टेकले, तेव्हा तेव्हा इस्रायलला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. भूतकाळातील ओस्लो करार असो किंवा 2006 चा लेबनॉन करार असो, आंतरराष्ट्रीय दबावामुळे इस्रायलचे नेहमीच मोठे नुकसान झाले असून गाझामधील परिस्थिती त्याचेच जिवंत उदाहरण आहे.

Itamar Ben Gvir Statement On Trump Deal
US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

बेन ग्वेर यांनी स्पष्ट केले की, आम्ही अमेरिकेवर (America) प्रेम करतो आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभारी आहोत, परंतु इस्रायल कोणताही 'बनाना रिपब्लिक' देश नाही. मी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना बंद खोलीतही हाच सल्ला देतो की, ऐतिहासिक क्षणी ऐतिहासिक निर्णय घेणे गरजेचे असते. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे की, आम्ही या कराराचा भाग नाही, कारण हा करार आमच्या सुरक्षेची कोणतीही हमी देत नाही. हिजबुल्लाहला पूर्णपणे संपवल्याशिवाय कोणत्याही तडजोडीचा प्रश्नच उद्भवत नाही.

Itamar Ben Gvir Statement On Trump Deal
US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

आमच्या शूर सैनिकांनी ज्या भागांवर ताबा मिळवला आणि जिथून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत, तिथून इस्रायली सैन्य एका इंचानेही मागे हटणार नाही. हजारो दहशतवादी पुन्हा आमच्या सीमेवर येऊन बसतील अशी कोणतीही चूक आम्ही करणार नाही.

Itamar Ben Gvir Statement On Trump Deal
US Iran War: ''दादागिरी खपवून घेणार नाही, सर्वनाश करु'', ट्रम्प यांच्या धमकीवर मोजतबा खामेनेईंचा पलटवार; आखाती देशांत युद्धाचं सावट कायम

एवढच नव्हेतर बेन ग्वेर यांनी इस्रायलच्या 3000 वर्ष जुन्या इतिहासाची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, आम्ही एक शाश्वत समुदाय आहोत जो प्रदीर्घ संघर्षाला घाबरत नाही. आमचा विश्वास ब्रह्मांडच्या रचयित्यावर आहे. जर लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने एक जरी ड्रोन किंवा क्षेपणास्त्र डागले गेले, तर इस्रायल त्याचे चोख उत्तर थेट 'दाहिया' (Dahiya) वर हल्ला करुन देईल. हाच आमचा शक्ती संतुलन राखण्याचा नियम आहे आणि तो आम्ही बदलणार नाही. यहुदी लोक मार सहन करुन गप्प बसायचे ते दिवस आता इतिहास जमा झाले आहेत. आता शत्रूसमोर मान झुकवण्याचा आमचा कोणताही इरादा नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com