France New Pension Scheme Protest Dainik Gomantak
ग्लोबल

France New Pension Scheme : फ्रान्समध्ये नव्या पेन्शन योजनेविरोधात हिंसक आंदोलन, नेमकं काय आहे प्रकरण सविस्तर वाचा

पेन्शन सुधारणांबाबत फ्रान्समध्ये सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

दैनिक गोमन्तक

पेन्शन सुधारणांबाबत फ्रान्समध्ये सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. देशातील नवीन पेन्शन योजनेच्या निषेधार्थ सुरू झालेली निदर्शने सुरूच आहेत. सरकारच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी गुरुवारी फ्रान्समध्ये लाखो लोकांनी मोर्चा काढला. यादरम्यान पॅरिससह देशातील काही भागात आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाल्याचे चित्र समोर आले आहे. (Protest in France Against New Pension Scheme)

  • सरकारी सेवांवर परिणाम

या प्रचंड निदर्शनादरम्यान अनेक संघटनांनी संप जाहीर करून अनेक सरकारी सेवा खंडित केल्या. उग्र निदर्शनांमुळे फ्रान्सच्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर वाईट परिणाम झाला. यादरम्यान पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पोलिस आणि पॅरिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष नोंदवला.

  • विधेयकाला विरोध का?

माहितीनुसार, स्थानिक संघटनांनी निवृत्तीचे वय वाढवण्याच्या सरकारच्या प्रस्तावित योजनेच्या विरोधात व्यापक संप आणि निषेध पुकारले आहेत. जर हे विधेयक मंजूर झाले तर फ्रान्समधील सरकारी नोकऱ्यांमधील निवृत्तीचे वय 62 वरून 64 होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

  • लोकांनी ही योजना नाकारली

IFOP सर्वेक्षणानुसार, जनतेने नवीन सुधारणा पूर्णपणे नाकारल्या आहेत. 68 टक्के लोक म्हणतात की ते कधीही स्वीकारणार नाहीत. त्याचवेळी, फ्रेंच मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पॅरिस पोलीस आता अशा निदर्शनांमध्ये जमणाऱ्या गर्दीला तोंड देण्यासाठी नवीन खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत. देशाचे गृहमंत्री गेराल्ड डरमॅनिन म्हणाले की, निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर 10,000 हून अधिक पोलिस तैनात केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT