Pakistan TTP Attack : पाकिस्तानमध्ये TTP च्या आत्मघाती हल्ल्यात 3 पोलीस अधिकारी ठार

TTP म्हणजेच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या पाकिस्तानमधील प्रतिबंधित संघटना (तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान) ने एक मोठा आत्मघाती हल्ला केला आहे
Pakistan TTP Attack
Pakistan TTP Attack Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan TTP Attack : TTP म्हणजेच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या पाकिस्तानमधील प्रतिबंधित संघटना (तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान) ने एक मोठा आत्मघाती हल्ला केला आहे, ज्यामुळे शेजारी देश पूर्णपणे हादरला आहे.

पाकिस्तानी तालिबानने वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील पोलीस चौकीवर मोठा आत्मघाती हल्ला केला असून त्यात किमान 3 पोलीस अधिकारी ठार झाले आहेत. टीटीपी गेल्या काही काळापासून पाकिस्तानला त्रास देत आहे.

Pakistan TTP Attack
Rishi Sunak भडकले, PM मोदींच्या डॉक्युमेंट्रीवरुन ब्रिटिश संसदेत गदारोळ

माहितीनुसार, पाकिस्तानी तालिबानने पोलीस चौकीवर केलेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी उत्तर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अफगाण सीमेजवळील पोलिस चौकीवर ग्रेनेड फेकले आणि कंपाऊंडमध्ये घुसले, जेथे आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवले.

या हल्ल्यात तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या अद्याप समजू शकलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

खरं तर, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच टीटीपीने पाकिस्तान सरकारला इशारा दिला होता की ते यापुढे युद्धबंदीचे पालन करणार नाहीत.

गेल्या वर्षी जूनमध्ये अफगाण तालिबानच्या मध्यस्थीने युद्धविराम करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, ज्यातून नोव्हेंबरमध्ये टीटीपीने माघार घेतली. टीटीपी पाकिस्तानमध्ये शरिया कायदा स्थापन करण्यासाठी लढत आहे.

TTP म्हणजेच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ही एक दहशतवादी संघटना आहे, ज्याला पाकिस्तानी तालिबान म्हणूनही ओळखले जाते. पाकिस्तानने आपल्या स्वार्थासाठी या दहशतवादी संघटनेला संरक्षण दिल्याचे बोलले जात आहे.

Pakistan TTP Attack
Pakistan Economic Crisis: दाने-दाने को मोहताज...! लाखो पाकिस्तानी लोकांसाठी निर्माण झालं विनाशकारी संकट

याआधी 14 जानेवारी रोजी जोरदार सशस्त्र तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील पेशावरच्या उपनगरात एका पोलिस स्टेशनवर हल्ला करून एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह तीन पोलिसांची हत्या केली होती.

पेशावरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) काशिफ अब्बासी यांनी सांगितले की सुमारे सहा ते सात दहशतवाद्यांनी खैबर आदिवासी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सरबंद पोलिस स्टेशनवर हँडग्रेनेड, स्वयंचलित शस्त्रे आणि स्नायपर गनने हल्ला केला. या हल्ल्यात तीन पोलिस शहीद झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com